Saturday, 1 December 2012

जागतिक एड्स दिन

अचानक आलेला
बहर तारुण्याचा
पेलता नाही आला

जाणून बुजून
लपविल्या चुका
मोठा अनर्थ झाला

जन्माला आलेल्या
निष्पाप जिवाला
उगाच घोर लावून गेला

उरले जगणे शापित
कळेना काय चुकले त्याचे
बिचारा जगण्या आधीच मेला...........संदेश प्रताप

जागतिक एड्स दिन........रुग्णाना हीन वागणूक देऊन त्यांच्या वर अजुन अत्याचार करू नका.....