Wednesday 3 October, 2012

तुझ्या पाऊल खुणा मी

तुझ्या पाऊल खुणा मी
तशाच जपल्यात,

एवढच की काळजाच्या कोपर्‍यात
कुठेतरी लपल्यात,,,,,,,...........संदेश प्रताप

माझं वागणं हे असच

माझं वागणं हे असच
नेहमी तुला दुखावतं,

तुझं नेहमी प्रमाणं समजून घेणं
मला मात्र सुखावतं............संदेश प्रताप

काही क्षण जगलो दोघे

काही क्षण जगलो दोघे
अख्खं आयुष्यं जसं,

पहिल्यावहिल्या पावसात
तहान भागवणारया चातका जसं...................संदेश प्रताप

कालचो पावस

कालचो पावस

काल मॉप दिसानि
तसोच पावस पडलो,
घशातलो घास
घशात जावन अडलो,
...

आठवलो फाटक्या कौलापरिस
फाटको तुटको आयेचो पदर
सोन्यासारखी माया तिची
कधीच केली नाय तिची कदर

आता नसलाव तरी
मोठे कशे वागाचा लागता,
खूप काय सान्गाचा हा तिका
तरी उपरयासारख्या जगाचा लागता........एक चाकरमानी.........संदेश प्रताप

अजूनव आठवता पावसात

अजूनव आठवता पावसात
सांचेच्या येळेक,

तुझी माझी नजरभेट
मांगराच्या पेळेक............संदेश प्रताप

समजून सुद्धा नकळत

समजून सुद्धा नकळत
मन हळव होऊन जातं,

उमजून सुद्धा पडलेलं उन
उगाच चांदणं होऊ पहात............संदेश प्रताप

मेरे जज़्बात

मेरे जज़्बात तेरे दिल को छू गये,
अब मौत भी आ जाए कोई गम नही-संदेश प्रताप

तुझ्या मिठीत

तुझ्या मिठीत
सुखं म्हणजे काय ते कळलं,

उद्ध्वस्त काजळालाही
भान नाही उरलं.................संदेश प्रताप

जेव्हा शब्द तुझे माझे

जेव्हा शब्द तुझे माझे अबोल झाले , तेव्हा मैत्रीतले अनुबंध मनाचे टिकून राहीले ...संदेश प्रताप

दूर विरल्या खुणा

दूर विरल्या खुणा
तुझ्या प्रीतिच्या ,

उरल्या काही पुन्हा
सुन्या सुन्या रातीच्या.........संदेश प्रताप

आज लिहीण्यासाठी खूप

आज लिहीण्यासाठी खूप सारं आहे पण फक्त "तू" जवळ नाहीस ...........संदेश प्रताप

गणपती स्पेशल !!!!

गणपती स्पेशल !!!!
भजानक सुद्धा बसायचा आम्ही
बरोबर जागा हेरून,

लय बेस वाटायचा जेवा
बघायचस वळयत्सून नजर चुकयत चोरून.......संदेश प्रताप

हल्ली लिहावं असं

हल्ली लिहावं असं काही सुचत नाही, तुझ्याशिवाय लिहण रुचत नाही.........संदेश प्रताप

तुझ्या जवळ नसण्याला सुद्धा

तुझ्या जवळ नसण्याला सुद्धा
खूप सारा अर्थ आहे,

कारण आठवणींशिवाय जगणं
उगा व्यर्थ आहे.......संदेश प्रताप

देतो उबदार माया

देतो उबदार माया तुझ्या काळजाचा ओलावा ..........संदेश प्रताप

माझं वेडं आभाळ

माझं वेडं आभाळ
तुझ्यापर्यंत पोचलेलं,

तुझ्या बोलक्या डोळ्यात
जणू गावं कस वसलेलं........संदेश प्रताप