Friday 22 February, 2013

मोहोर

सकाळच्या पाराक तो
आंग दुमडून निजलेलो
शा शंभर सपनांमधी
रातभर रुजलेलो

ऐन भरात असताना
मेलो फोन सनसनलो
सकाळ उजवडी हुनान
तू दुकु भनभनलो

आज पावस भरलो हा
तुया सांग खय भेटाया
एकमेकांच्या डोळ्यांमधसून
एकमेकांमधी दाटाया

झानकन झापड उडाली
सपानांची झालर दडाली
खराच की काय पावस भरलो हा?
कधी नाय तो अवन्दा मोहोर बेस धरलो हा

शेवटी पावसान नेहमी परमान
दगो दिल्यानच
तेना दुकु खाजणात हात धरून
फिराक नेल्यानच

डोळ्यात तेच्या बगता बगता
तो बिचारो उभ्या उभ्या बावलो
रक्ताची माती करून धरलेलो मोहोर
तेच्या डोळ्यात्सून भसा भसा व्हावलो

वले डोळे पुशीत तो
तेका हसत हसत म्हणालो
अवन्दा गरमीत येळच येळ हा
नाय रवलो मोहर अख्खो आम्बो गळालो................संदेश प्रताप