Friday 30 September, 2011

मेरा देस महान

पोरान्का नाय गावना खावक
धड दोन टायामाचा जेवान,

तरी बेम्बयेच्या देठTपासून आरडायचा
मेरा देस महान...........

चारोळ्या संदेशच्या

मी काही तुझा कट्टर भक्त नाही
वेळ मिळेल तेव्हा , असेन तिथून नमस्कार करतो...
तुझ्या अस्तित्वाला मी मानतो...पण तुझ्या आहारी जाणं मला अजिबात मान्य नाही,
कदाचित तुला सुधा मान्य नसेल.
सर्वात महत्वाचं म्हणजे मला तुझ्या कडून काहीतरी हवय म्हणून मी तुला नमस्कार करतोय अश्यातला भाग नाही.
एवढच की जेवढं मिळवलाय आता पर्यंत ते तुझ्या आशीर्वादनेच आहे म्हणून तुझ्या चरणी लीन होण्यासाठी ............तुझी बाह्य रूपे अनेक आहेत पण अन्तरात्मा मात्र एकच....गूढ तरी पण सदैव अवती भवती असल्याची जाणीव करून देणारा......

Saturday 24 September, 2011

गझल तुझ्या प्रीतीची

चारोळ्या संदेशच्या

रणरणत उन

अलीकडचो गाव

मालवणी चारोळ्या संदेशच्या

सगळं कसं अचानक घडलं

मालवणी चारोळ्या संदेशच्या

रातीच्या भजनाक तुका बघूचा असायचा
शेणाच्या जमिनीवर कोपरो शोधून बसायचा
तुया सुधा भावाची नजर चोरून गालातल्या गालात हसायचा
निसत्या चोरटया नजरेन काळजात काळीज जावन घुसायचा..

चारोळ्या संदेशच्या

Monday 19 September, 2011

मालवणी माणसा
मालवणी माती,
आयुष्यभर जपतत
माणुसकीची नाती

Friday 16 September, 2011

मी काही मातब्बर कवी नाही
सूर्याला सूर्यच म्हणतो रवी नाही

थोडसं लिहितो "असच आपलं मनातलं"
चुकलो माकलो तर माफ करण्याची तसदी घ्यावी

Wednesday 14 September, 2011

तिने विचारलं अरे सांग ना ?? सुख म्हणजे नक्की काय असतं???

मी म्हटलं

तुझ सकाळी भिजलेल गोंडस रूप असत............

ती पुन्हा चिडून म्हणाली अरे सांग ना???


मी म्हटलं

तुझ अस लटक रागावण खूप असतं

आता मात्र अबोला, मी सुधा जरा मुद्दाम हटून बसलो

संध्याकाळी मात्र तिला राहवल नाही...

डोळ्यात पाणी आणून घट्ट मिठी मारली तिने

मी हलकेच अश्रू पुसले , आणि म्हणालो

आता तरी कळलं का सुख म्हणजे नक्की काय असत?

ती हसली आणि म्हणाली हो... मी म्हटलं काय???

माझे अश्रू पुसायला तू माझ्या जवळ असण .....नसलेला दुरावा सुधा सहन न होणं...हेच माझ सुख

Sunday 11 September, 2011

वांझोटा



एका ताज्या सत्य घटनेवर आधारित ही कविता आहे

आट पाट नगरात होते राजा आणि राणी
त्यांच्या संसाराची ही ओंगळवाणी कहाणी

नव्याची नवलाई सरुन गेली
संसाराच्या गराड्यात दडून गेली

राजा वेडा कामात व्यग्र
घरची जबाबदारी राणी वर समग्र

दोघही पाहत होती एकच वाट
स्वप्न रंगवायचे जागून सारी रात

म्हणता म्हणता वर्ष लोटलं
शंकेने काळजीचं धुक दाटल

वैद्य केले बुवा केले, केले उपास तापास
पण वरच्याच्या इच्छे पुढे सगळेच होते नापास

राजा राणी बिचारे झाले उदास
ना लागेना भूक ना उतरेना घास

राजाचा होता एक जीवभावाचा सोबती
राजाराणी च्या दुखाची कळली त्याला व्याप्ती

न राहावून त्याने विचित्र सल्ला त्याला दिला
कोणातरी जवळच्या माणसा करवि मूल होऊदे तिला

मुलाच्या हव्यासा पाई राजा सगळं विसरला
राणीला परक्याशी शैया करण्या इतपत पुरता घसरला

तो सोबती त्याला देवदूत भासला
मूल देण्यासाठी हाच सोबती योग्य आहे मनात त्याच्या ठसला

पुन्हा वर्ष लोटून गेलं
पुन्हा संशयान काळजीच धुक दाटून गेलं

देवदुतासमान सोबती त्याला दुष्ट वाटू लागला
माझ्या राणीशी शय्येसाठी का तो असा वागला????

मित्राने त्याला खूप समजावले
मी सुख नाही घेतले फक्त कर्तव्य पूर्ण केले

पण राजा आता पुरता बिथरला
संशय त्याच्या मनात पूर्ण उतरला

अमावस्येची रात्र त्याने अखेर साधली
लाडक्या राणी सोबत सोबत्याची मान त्याने चिरली

दोघांच्या देहा जवळ ढसा ढसा रडला
बहुतेक दूर वर एक कुत्रा सुधा मनातल्या मनात कुढला

राजाराणी ची कहाणी ऐकून उर फाटून गेला
जाता जाता मनात एक प्रश्न दाटून गेला

समाजात वांझोटा , नपुसन्क ह्या शब्दाना स्थान का??
वंशाला दिवा हवा असा अट्टहास का???

विचार मग्न असताना अचानक भाना वर आलो

" अहो झाली आता दोन वर्ष , पुरे झाल कुटुंब नियोजन,
जग काय म्हणेल???"

बायकोचा आवाज ऐकून वंशाच्या दिव्यासाठी सगळे प्रश्न बाजूला सारून मनोमन तयार झालो.