Tuesday 23 July, 2013

भाग मिल्खा भाग #

भाग मिल्खा भाग #

आपल्या देशात कर्तुत्ववान लोकांची कमी नाही, पण खूप कमी जण आपल्या कर्तुत्वाद्वारे आपल्या देशाचं नाव जगभरात मोठं करतात. अश्या च काही महान लोकांपैकी एक म्हणजे मिल्खा सिंघजी. माझ्यासकट आपल्या पिढीतील बहुतांश मंडळीना एकतर हे नाव... माहीत नसेल किव्वा माहीत असले तरी त्यांची अफाट कामगिरी नक्कीच माहीत नसेल.

सुरवातीलाच राकेश मेहरा याना मानाचा मुजरा करतो, कारण त्यानी ह्या चित्रपटाद्वारे एका महान पण २०-२०च्या ओघात विस्मरणात जाणार्या अस्सल नायकाचा अक्षरशः जीवनपट उभा केला.

चित्रपटाची सुरवात होते ती रोम १९६० च्या ओलिंपिक स्पर्धेने , काही शतांश सेकंदानि मिल्खा सिंघ यांच पदक हुकतं, खरतर ते सुवर्ण पदाचे दावेदार असतात, आणि इकडे भारतात त्यांच्या विरोधात असंतोष तयार होतो, त्याच दरम्यान भारत सरकार पाकिस्तानला राजकीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने मैत्री पूर्ण मैदानी स्पर्धेचे आवाहन करते आणि भारता तर्फे संघ प्रमुख म्हणून मिल्खाजी याना पुढे केलं जातं पण मिल्खाजी पाकिस्तानला जायला तयार नसतात. शेवटी सरकार त्यांची मनधरणी करायला एक टीम पाठवते त्यात एक त्यांचे सुरवातीच्या काळातले कोच आणि राष्ट्रीय कोच असतात.....आणि इथून चित्रपट फ्लॅशबॅक मद्धे घेऊन जातो...
या नंतर चालू होते ती मिल्खा सिंघ यांची खडतर वाटचाल, ह्या वाटचालीच्या दरम्यान नकळतपणे चित्रपट मनास कुठेतरी स्पर्शून जातो...ही वाटचाल मात्र वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यात खरी मजा आहे.

फरहान खान- ताकदीचा अभिनेता ही त्याची ओळख त्याने सार्थ ठरवलीय, भूमिका अक्षरशः जगलाय .....भन्नाट ....

सोनम कपूर- नसली असती तरी चालल असतं, खास म्हणाव असा काही नाही, त्याच त्याच भूमिका मिळताय त असं वाटलं रांझाणाच शूटिंग आटपून इथे येत असावी.....ओवर ऑल ठीक ......

प्रकाश राज- थॅंक्स टू राकेश मेहराजी , काहीतरी नवीन दिलं, त्याच त्याच भूमिकांमधे पाहून कंटाळा आला होता, पण उत्तम अभिनेता , आपल्या भूमिकेला न्याय दिलाय.

दिव्या दत्ता- एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध, मिळालेल्या भूमिकेचं सोनं कसं करावं हे हिच्या कडून शिकावं...झक्कास....

पवन मल्होत्रा- ह्या माणसा बद्दल थोडी आधीपासून उत्सुकता होती.....खूप जुना छोट्या पडद्यावरील अभिनेता ...फरहान नंतर जर कोणी असेल तर हा ...भूमिका जगलाय.....नेहमी प्रमाणे

बाकी सर्वजण आप आपल्या जागी योग्यच, लक्षात राहिला तो बाल कलाकार, ज्याने मिल्खासिंघ जींच लहानपण वठवलय.

राकेश ओम प्रकाश मेहरा - खरा हीरो.....अफलातून दिग्दर्शन.......छोटे छोटे बारकावे लक्षात येण्या जोगे...

प्रसुन जोशी यांची पटकथा , गाणी उत्तम, प्रसंगास अनुरूप, " मेरा यार" खूप सुंदर.."मस्तो का झुंड" लय भारी कोरिओग्राफी.....बाकी सगळी गाणी तेवढीच ताकदीची....एक मात्र नक्की चित्रपट थोडासा लांब ल्या सारखा वाटला, १० ते१५ मिनिट लांबी कमी करता आली असती ....बाकी अतिउत्तम........आत्ताच महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केलाय.......जर नाही पहिला असेल तर नक्की पहा ......जय हो.........संदेश प्रताप

तुझा भास माझ्या

तुझा भास माझ्या
हृदयाला कळाला,
क्षणास त्या गाठुनी
अनुबंध जुळाला

जगता तुझ्याशी
जिण्या अर्थ मिळाला,
तुझ्या सवे माझा
असे ऋतू निराळा,

... नसे आज कुठे
दु:खा ना किनारा,
दिलास तू जणू
सुखाना निवारा

तू असता जवळी
रात्र ना दिवस सरावा,
तुझ्या कुशीत सये
पूर्ण जन्म उरावा..........संदेश प्रताप

पावस इलो भरान आता

पावस इलो भरान आता
भरान व्हावात व्हाळी,

म्हायत नाय कदी गावात
तुका भेटाक साकवा खाली ..........संदेश प्रताप

Monday 15 July, 2013

फाटक्या सुखाना कुरतडतो

फाटक्या सुखाना कुरतडतो मी
लोका वाटे माझा हेवा,

रडतो मी नकळत त्यांच्या
हजार दु: ख्खे माझ्या गावा...........संदेश प्रताप

हल्ली माणुसकीला सुद्धा

हल्ली माणुसकीला सुद्धा
जाती पातीच दार असतं,

जसं मोठ्या घरात सुद्धा प्रत्तेकाच
एका खोलीच स्वतंत्र घर असतं............संदेश प्रताप

फिर वोही रात है

फिर वोही रात है
फिर वोही बात है
न चाहते हुए भी
तू मेरे साथ है

फिर वोही रात है

लगता है डर भी अभी
न करू फिरसे वफ़ा,
खुश ही तो रहता हू
... जो कहते लोग बेवफा

फिर वोही रात है

अब कर रहम मुझपे
ना दिखा ऐतबार इतना,
ढलने दे इस रात को
दर्द होता है,जब मिलता है सुकून इतना

फिर वोही रात है...................संदेश प्रताप

Friday 5 July, 2013

पावस काय थामाचा

पावस काय थामाचा
नाव घेना नाय,
झीलाची मनी ऑर्डर
काय येना नाय,

म्हातारी मातुर
तेवडीच मानी,
हात नाय पसरुक
खावन रवली सुकया खोबरा नि पानी................संदेश प्रताप

निष्पाप भक्तांचा खच

निष्पाप भक्तांचा खच
देवळाशी पडला ताजा,

का कुठे हरवला
त्या देवळात देव माझा? ...........संदेश प्रताप

बाळगो आणि शकल्याची वरात

बाळगो आणि शकल्याची वरात
इली हळूच मागल्या दारान,

बापूस हुनता शिरा पडो
तरवो लावक नड इली भरान................संदेश प्रताप