Sunday 17 March, 2013

फोबिया............


सकाळचा प्रहर
ओल्यात्या अंगाने ती,
खिडकीच्या बाहेर
एक छोटसं तुळशी वृंदावन,

प्रसन्न मनाने अर्धध्यान
करून पाठ फिरवताना अचानक,
काही कुजलेली पाने तिच्या सहज दृष्टिक्षेपात
हात सरसावले नकळतपणे साफ करण्या,

तो (किडा) निरागस अनभिन्य
लपेटून स्व:ताला
नवीन पालवीच्या शोधात,

साहजिक स्पर्श थंडगार
त्याच्या शरीराचा,
तिचा फोबिया जागृत होताच
ऐकु आली ती अस्फुट किंचाळी

मला जाग आली तेव्हा
ती मात्र माझ्या घट्ट मिठीत,
तिच्या हृदयाची धडधड
माझ्या काळजावर उमटलेली

डोळ्यातल पाणी थेट
माझ्या खांद्यावर बिलगुन,

मी मात्र झाल्या परिस्थितीचा
आढावा घेत खुश
मनातल्या मनात त्याचे
आभार मानत

नाहीतर तिच्या ओल्यात्या
अंगाचा स्पर्श आणि गंध
पाणावलेल्या डोळ्यांसकट

केव्हा आणि कसा?..................संदेश प्रताप