Thursday 9 May, 2013

तो , ती, आजी

तो

शेवटचे श्वास मोजतेय ती ,
तिची शेवटची इच्छा म्हणून तर चल,
तुला सुद्धा भेटल्याचं समाधान मिळेल

ती

मला सुद्धा आवडलं असतं रे यायला
पण माझ्या कमिट्मेंट्स
... ऑफीस मीटिंग्स , त्यात पुन्हा खर्च

तो

अगं आजी आहे ती माझी
अंगाखांद्यावर खेळलोय मी तिच्या
आणि आज तिला गरज असताना
साधं एवढं सुद्धा करू शकत नाही आपण

ती

उगाच ओव्हर इमोशनल होऊ नकोस
बी प्रॅक्टिकल !!!
आणि तू जातोयस ना
काहीतरी कारण दे माझ्या न येण्याचं

आजी

निपचित पडून
त्याच्या नुसत्या चाहूलीने
थरथरली , पुटपुटली

काहीतरी हातात घट्ट पकडून ठेवलेलं

भरल्या डोळ्या नि फक्त हात हातात देऊन

चुरलेली १०० रुपयाची नोट त्याच्या हातावर दिली

आणि म्हणाली "तिका दी, काय तरी घेवन्दे "

तो

फक्त तिच्या कडे पहात होता
डोळ्यातून अश्रुंचा कडेलोट

फक्त एकच विचार करत

एवढं निस्वार्थी, इमप्रॅक्टिकल मन हिच्याकडे आलं कुठून.......संदेश प्रताप

अजूनव आठवता

अजूनव आठवता आये
काय्येक कारण नसायचा
जेयताना ठसको येवक,

बगुक गावायची त्या निमतान
मायेन भरलेली धुका नि कालवाकालव्
ताम्बयोभर पानी देवक.................संदेश प्रताप

Friday 3 May, 2013

तो

तो
एक खिडकी
अखंड बरसणारा पाऊस

असून नात्याचा अनुबंध एकमेकांशी
सगळेच तरीही "एकाकी"
शोधीत जुन्या
खुणा ....................संदेश प्रताप