Saturday 1 December, 2012

जागतिक एड्स दिन

अचानक आलेला
बहर तारुण्याचा
पेलता नाही आला

जाणून बुजून
लपविल्या चुका
मोठा अनर्थ झाला

जन्माला आलेल्या
निष्पाप जिवाला
उगाच घोर लावून गेला

उरले जगणे शापित
कळेना काय चुकले त्याचे
बिचारा जगण्या आधीच मेला...........संदेश प्रताप

जागतिक एड्स दिन........रुग्णाना हीन वागणूक देऊन त्यांच्या वर अजुन अत्याचार करू नका.....


 

नकळत मन वेडे हे

नकळत मन वेडे हे
होऊ पाहते तुझे,

जगण्या तुझ्या सोबतीने हे
पुन्हा पुन्हा रूजे...........संदेश प्रताप

भावना तुझ्या बोलक्या

भावना तुझ्या बोलक्या
तरी तू असे का वागावे,

व्यक्त होण्या तुला
शब्द का लागावे ?.............संदेश प्रताप

Sunday 4 November, 2012

माना के तुमसे दूर रहना कड़ी सज़ा है

माना के तुमसे दूर रहना कड़ी सज़ा है,
लेकिन तेरी यादोमे जीने मे भी एक अलग मज़ा है ♥..........संदेश प्रताप

कुछ तोह असर है तेरे प्यार मे

कुछ तोह असर है तेरे प्यार मे
जो आज भी हम आबाद है,

वरना हमारी तकदीर इतनी बेअसर थी
के कबके बरबाद थे....................संदेश प्रताप

अवसेची रात

अवसेची रात
बतयेत नाय वात,

तू उंबर्‍यार बसलस
थेट काळजाक डासलस,

तितक्यात सरसरलो पालो
पावस धावान इलो वलो

येवन मिठीत घुसमाटलस
आंगार ईलेली नीज इस्कटलस

तुझी माया म्हंजे असाच वादाळ
जुना असान नया भरलेला काजाळ..............संदेश प्रताप

किंणकिणाट तुझ्या काकणांचो

किंणकिणाट तुझ्या काकणांचो
अजूनव तसोच,

भर गर्दीत सुद्धा आवशीच्यान
इसराचय नाय कसोच............संदेश प्रताप

हळव्या मनाला

हळव्या मनाला कसं समजवावं?
मनापासून वाटतं तुला तरी उमजावं...........संदेश प्रताप

बोचरया थंडीपेक्षा

बोचरया थंडीपेक्षा ही बोचरं तुझं जवळ नसणं........संदेश प्रताप

"तळीवाली बाय".

निम्हार इसवतीक
बायल बापडे ढोरापोरा
माघारी भाकरीच्या आशेन,
सरभरलेलि पाखरा घरट्याच्या दिशेन,

ओ उठतास की नाय ?
...
बायलेन हाळी दिल्यान
कडकडणार्या पानयाचे
चार तांबे आंगर उपसून तो तयार

आंगार कापडा चढवून
पोरा आंगाक खेटलेली
बाबानु जाव नको
झाला तरी आमका तुमचा खावक नको


तितक्यात बायलेन भाकरी
पुढयात आपटल्यान
“कसला नसता खूळ घेतल्यानी हा”
म्हणान रडणार या पोराक धोपटल्यान

अंधार पडा पडाक
अंदाज घेवन भायर पडलो
फाटकी पिशी पोटाशी बांधून
बिचारो घळाघळा रडलो

डोळ्यातली आसवा गिळान
चलाक लागलो जणू काय झालाच नाय,
नशीबाच्या दशावतारान बनायल्यान तेका
"तळीवाली बाय"...............संदेश प्रताप

Wednesday 3 October, 2012

तुझ्या पाऊल खुणा मी

तुझ्या पाऊल खुणा मी
तशाच जपल्यात,

एवढच की काळजाच्या कोपर्‍यात
कुठेतरी लपल्यात,,,,,,,...........संदेश प्रताप

माझं वागणं हे असच

माझं वागणं हे असच
नेहमी तुला दुखावतं,

तुझं नेहमी प्रमाणं समजून घेणं
मला मात्र सुखावतं............संदेश प्रताप

काही क्षण जगलो दोघे

काही क्षण जगलो दोघे
अख्खं आयुष्यं जसं,

पहिल्यावहिल्या पावसात
तहान भागवणारया चातका जसं...................संदेश प्रताप

कालचो पावस

कालचो पावस

काल मॉप दिसानि
तसोच पावस पडलो,
घशातलो घास
घशात जावन अडलो,
...

आठवलो फाटक्या कौलापरिस
फाटको तुटको आयेचो पदर
सोन्यासारखी माया तिची
कधीच केली नाय तिची कदर

आता नसलाव तरी
मोठे कशे वागाचा लागता,
खूप काय सान्गाचा हा तिका
तरी उपरयासारख्या जगाचा लागता........एक चाकरमानी.........संदेश प्रताप

अजूनव आठवता पावसात

अजूनव आठवता पावसात
सांचेच्या येळेक,

तुझी माझी नजरभेट
मांगराच्या पेळेक............संदेश प्रताप

समजून सुद्धा नकळत

समजून सुद्धा नकळत
मन हळव होऊन जातं,

उमजून सुद्धा पडलेलं उन
उगाच चांदणं होऊ पहात............संदेश प्रताप

मेरे जज़्बात

मेरे जज़्बात तेरे दिल को छू गये,
अब मौत भी आ जाए कोई गम नही-संदेश प्रताप

तुझ्या मिठीत

तुझ्या मिठीत
सुखं म्हणजे काय ते कळलं,

उद्ध्वस्त काजळालाही
भान नाही उरलं.................संदेश प्रताप

जेव्हा शब्द तुझे माझे

जेव्हा शब्द तुझे माझे अबोल झाले , तेव्हा मैत्रीतले अनुबंध मनाचे टिकून राहीले ...संदेश प्रताप

दूर विरल्या खुणा

दूर विरल्या खुणा
तुझ्या प्रीतिच्या ,

उरल्या काही पुन्हा
सुन्या सुन्या रातीच्या.........संदेश प्रताप

आज लिहीण्यासाठी खूप

आज लिहीण्यासाठी खूप सारं आहे पण फक्त "तू" जवळ नाहीस ...........संदेश प्रताप

गणपती स्पेशल !!!!

गणपती स्पेशल !!!!
भजानक सुद्धा बसायचा आम्ही
बरोबर जागा हेरून,

लय बेस वाटायचा जेवा
बघायचस वळयत्सून नजर चुकयत चोरून.......संदेश प्रताप

हल्ली लिहावं असं

हल्ली लिहावं असं काही सुचत नाही, तुझ्याशिवाय लिहण रुचत नाही.........संदेश प्रताप

तुझ्या जवळ नसण्याला सुद्धा

तुझ्या जवळ नसण्याला सुद्धा
खूप सारा अर्थ आहे,

कारण आठवणींशिवाय जगणं
उगा व्यर्थ आहे.......संदेश प्रताप

देतो उबदार माया

देतो उबदार माया तुझ्या काळजाचा ओलावा ..........संदेश प्रताप

माझं वेडं आभाळ

माझं वेडं आभाळ
तुझ्यापर्यंत पोचलेलं,

तुझ्या बोलक्या डोळ्यात
जणू गावं कस वसलेलं........संदेश प्रताप

Monday 13 August, 2012

वोह तो आँखे थी

तुझ्या घरापर्यंत पोचलेलं

जिंकली मी राखून

कळलेच नाही जगताना

कधीतरी माझ्यासाठी

आठवणींचा मागोवा

Tuesday 7 August, 2012

फुटकी कौला

Monday 6 August, 2012

मन मोकळं होतं

दुरावले काही क्षण

एक ही दुआ है रबसे

जखडलेली जुनी प्रथा

Friday 27 July, 2012

भरल्या डोळ्यानि मला

भरल्या डोळ्यानि मला
जेव्हा पहातेस तू,

निष्पाप काजळाला
उगाच त्रास देतेस तू................संदेश प्रताप

Thursday 26 July, 2012

थरथरलो उजेड फानसाचो

थरथरलो उजेड फानसाचो
जेवा तू किनाट काळोखात खेटलस,

सरसरलो पालो पाचोळो
तुया मातुर जुना तसाच भेटलस............संदेश प्रताप

Tuesday 24 July, 2012

दर्द हुआ तो

दर्द हुआ तो
मर्ज भी तू है

शायर मै खाक हू
मेरा "अर्ज़" भी तू है ...........संदेश प्रताप

Monday 23 July, 2012

तुझं जवळ नसणं

Friday 20 July, 2012

"बालपण"

ना माय बाप भाऊ बहीण
ना कुणी इथे रक्ताचं दिसतं

जगले उरी प्रश्नार्थक आयुष्य
न कळले कधी हे "बालपण" काय असतं? ..........संदेश प्रताप

फुलाचा जगण्याचा तग

फुलाचा जगण्याचा तग
इवल्याश्या कळ्यात,

अख्खं माझं जग
तुझ्याच दोन डोळ्यात.........संदेश प्रताप

Thursday 19 July, 2012

मी चालत राहतो न पहाता

मी चालत राहतो न पहाता
अश्रूना गुन्हा कळेपर्यंत,

तू मात्र पहात राहतेस
माझी नजर पुन्हा वळेपर्यंत.......संदेश प्रताप

Wednesday 18 July, 2012

तुझी माया तशी साधी सरळ

तुझी माया तशी साधी सरळ
थेट काळजाला  भिडते,

तू नसलीस क्षणभर तर
कळते माया का जडते .............संदेश प्रताप

म्हातारी आये .........

म्हातारी आये .........

पिकलेल्या मोतिबिन्द वात्सून
झिरापणारी दुका जेवा माका दिसली,

गोठून ठेवलेली माझी दुका
काकूळतिक येवन माका हसली......संदेश प्रताप

Monday 16 July, 2012

जणू अत्तर जसा

जणू अत्तर जसा
जिवाला लागलास तू,

न राहता कुपिबंद
तुफान वागलास तू

 मरणा सुगंधी बनून
बेभान जगलास तू..........संदेश प्रताप

Sunday 15 July, 2012

अब बस आहट है
शायद तुम्हारे आने की,
मेरे बाहों मे मुस्काराकर
यूही सिमट जाने की

बरसे पानी की बूंदे हाथों मे लिए,
तुम मेरे कानोंमे जब गुनगुनाती हो,
मेरी आँखे समा बांध देती है
दिल ही दिल मे बरस जाने की

ये बारिश भी बड़ी उलझी है
पत्थर जैसे दिल को उलझा देती है,
कभी कबार ये गुस्ताख दिल भी
हस लेता है सुनके "आहट" तुम्हारे आने की..........संदेश प्रताप

Saturday 14 July, 2012

आता गटारीची मजा रवाक नाय



तेवा वर्सातुन चारदा
कोंबडा कापायाचा,
आज्येन जीवाचा रान करून
तेन्का फाटीबुडी झापायचा

 आता आठवड्यात्सून
दोनदा बॉयलर,
तर कधी हायफाय
रेडिमेड पाय,

आता गटारीची मजा रवाक नाय

त्या निमतान सगळे
घराक परतान यायचे,
जुने दोस्त दार,भावबहिणी
गजालि व्हायचे

आता जो तो कमावनारो
भायल्या मजेक सवाकलो,
हेंचे पाय आता घरात
आवशीबापाशी वांगडा थारत नाय

आता गटारीची मजा रवाक नाय

जुन्या आगळाची सोलकढी
नि घरचो लाल भात,
चुलिवरचा मटान खाता खाता
मस्त संपण जाय रात

आता जो तो फाड फाड इंग्रजी बोलणारो
तेंचीच संस्कृती तोलनारो,
बियर नि बाटले शिवाय बिगर
जेवाण घशाखाली उतरत नाय

आता गटारी ची मजा रवाक नाय.................संदेश प्रताप

Tuesday 10 July, 2012

पुन्हा तू भेटशील तेव्हा

पुन्हा तू भेटशील तेव्हा
तू तेवढीच गोड दिसावी,

बरसणार्‍या पावसाला देखील
थांबण्याची तमा नसावी..............संदेश प्रताप

Sunday 8 July, 2012

भर पावसात वालीवर्सुन

भर पावसात वालीवर्सुन
पेंडका घेवन जाता जेवा शकला,

धाड धाड काळीज माझा
हुतत तेचि तेवा दोन भेकला.............संदेश प्रताप

Thursday 5 July, 2012

दर राती निजताना

दर राती निजताना
काळीज माझा झुझता,

दर येळेक बोलान हुनतय
पण बोलाक तुझ्याशी बुजता..........संदेश प्रताप

जरी होता तेजस्वी कर्ण सूर्यपुत्र

जरी होता तेजस्वी कर्ण सूर्यपुत्र
तरी सुतपुत्र शापित वार होता,

आयुष्याच्या शेवटी उरला तो फक्त
कुंतीचा निष्पाप "व्याभिचार" होता..............संदेश प्रताप

आज पुन्हा पाऊस

आज पुन्हा पाऊस
अर्धा भिजलेला,

तुझ्या आठवणींमधे
अर्धा रुजलेला.........संदेश प्रताप

Tuesday 3 July, 2012

सकाळी सकाळी

सकाळी सकाळी जेव्हा तू
तुळशीर पाणी घालुक येतस्,

दिवसा उजेडी तेव्हा तू
माझा काळीज चोरून नेतस...........संदेश प्रताप

Monday 2 July, 2012

आयुष्यभर उराशी बांधून जगलो

आयुष्यभर उराशी बांधून जगलो
खळगी भर पोटाची भ्रांत,

माय मायेनं देई मीठ भाकरी
जगण्याची नव्हती खंत...........संदेश प्रताप

Sunday 1 July, 2012

त्या रात्री सरले

त्या रात्री सरले
ते निष्ठुर चांदणे,

ना जमले नजरेने
तुला बांधणे...............संदेश प्रताप

Friday 29 June, 2012

"विठ्ठल विठ्ठल" नावाचा खोटा

"विठ्ठल विठ्ठल" नावाचा खोटा
चित्कार कानी आला,

निष्पाप भक्तिभावाचा
आज पुन्हा "बलात्कार झाला"...........संदेश प्रताप

निरपेक्ष भक्ति करणार्‍या विठ्ठल वेड्याना शुभेच्छा !!!

जेवा येशित पावसात अव्न्दा

जेवा येशित पावसात अव्न्दा
तेव्हा सावशीत भेटान जा,

तीनसाना किर्र काळोखात
त्याच पान्द्नित खेटान जा.......संदेश प्रताप

Thursday 28 June, 2012

जेव्हा पापण्यांचे

जेव्हा पापण्यांचे
एकमेकांवरती वार झाले,

तेव्हा बेसावध "काजळ"
हकनाक ठार झाले..........संदेश प्रताप

Wednesday 27 June, 2012

जेव्हा समजून घेणारं नातं

जेव्हा समजून घेणारं नातं
असमजूतदार होतं,

तेव्हा खूप सारं बोलून सुद्धा
बोलणं रीत राहतं ...........संदेश प्रताप

Tuesday 26 June, 2012

गुनहगार है आपके

गुनहगार है आपके दिल से
इसका हमे कोई गम नही,

कातिलाना मुस्कुराना आपका
गुनहगार आपभी कुछ कम नही............संदेश प्रताप

Sunday 24 June, 2012

बॅचलर्स......


बॅचलर्स......

गजबजलेल शहर
दमुन घरी जाण्यास व्याकूळ
रिप रिप पाऊस
भिजलेली रात्र

अस्तावस्त खोली
जाणून बुजून केलेला अंधार
एक झीरोचा बल्ब
पेटून नसल्यासारखा

चार पाच जिगरी दोस्त
भिंतीच्या आधराने टेकलेले
त्याच त्याच प्रोफेशनल लाइफला
अगदी मनापासून पकलेले

चार पाच टाइम्स ऑफ इंडियाची पाने
वेडी वाकडी पसरलेली
चिवडा, चकली, शेंगा ची पिशवी
उगाच तिच्यावर घसरलेली

पाच सहा स्ट्रॉंग बियर,चायनीस
बरोबर इकॉनॉमिकल जॉइंट उर्फ सुटटा
चढत जाणार्‍या पावसाबरोबर
फुलत होता रात्री ब्याचलर्सचा कट्टा....................संदेश प्रताप

Tuesday 19 June, 2012

झिला अवन्दाचो मिरग

झिला अवन्दाचो मिरग
बरो हा सो दिसताहा,

जा जा पेरलव
ता येवस्थित रुजाताहा..........संदेश प्रताप

Sunday 17 June, 2012

काल अचानक नजर

काल अचानक नजर
भिडवून गेलिस,

पुन्हा निष्पाप डोळ्याना
रडवुन गेलिस.............संदेश प्रताप

Saturday 16 June, 2012

द्रौपदी

मनातले श्वापद जेव्हा
वासनांध झेप घेते,

निष्पाप द्रौपदी तेव्हा
नजरेने विवस्त्र होते.............संदेश प्रताप

Friday 15 June, 2012

आपण

सावळा वर्ण
बोलके डोळे
थोडसं काजळ
हसरा चेहरा

म्हणजे "तू"

गंभीर चर्या
वेडी माया
कोड्यात हसणं
... तुझ्याशी असणं

म्हणजे "मी"

आश्वासक सहवास
विश्वासाचा प्रवास
एकमेकांचा ध्यास
सोबत असण्याचा प्रयास

म्हणजे आपण ........................संदेश प्रताप

निसटल्या क्षणांची खंत

निसटल्या क्षणांची खंत
वेड्या दिलाशी टांगली,

तुझ्या नसण्याची व्यथा
साजरी करावी लागली.............संदेश प्रताप

Monday 11 June, 2012

कोंच्या तरी लग्नाक दिसलस

कोंच्या तरी लग्नाक दिसलस
बोलाक नाय गावलो मोको,

इलस कधी गावच्या दिशेन
तर भेटल्या बिगर जाव नको...........संदेश प्रताप

Sunday 10 June, 2012

तू म्हणालीस मी हरवलेय

तू म्हणालीस मी हरवलेय
वाटत नाही तुझ्या सोबत असेन,

कधी वाट सापडेलही
पण मी तिथे नसेन...............संदेश प्रताप

झळा पावसाच्या

झळा पावसाच्या कितीश्या उराव्या, आठवणींच्या हिंदोळ्यावरी अमानुष ठराव्या.......संदेश प्रताप

पहिला पाऊस

तुझं माझं नातं पहिलं पहिलं
भर पावसात डोळ्यात भरून राहिलं,

तू म्हणालिस आज पाऊस आला
पण खटकल तुझं नसणं,
मी हसून म्हणालो मग काय झाल?
... मला भावलं तुझं असं रुसण

तशीच फोन वर तू उगाच चिडलीस
"आता किती दिवस असं जगायचं"
चिडल्यावर तू अजुन सुंदर दिसतेस्
म्हणून का चिडून वागायचं?

पावसाची झर झर तशीच चाललेली
त्याची झळ मला दूरवर काळजात लागलेली,
"पुढच्या पावसात तर आपण सोबत असू?"
"खरच रे एकमेकाच्या मिठीत भान हरवून बसू"

आपल्या नात्याचा पहिला पाऊस असाच पडला
पहिला दूराव्याने रडला, अन् मग दूराव्याशी लढला

पहिला पाऊस तुझ्या पासून दूर
खूप काही सांगून गेला,
रोम रोमात स्पर्शून
हळूवार काळजातून रांगून गेला.......................संदेश प्रताप

पाऊस

कांदाभाजी फूल प्लेट एक
सोबत कटिंग, छोटा गोल्ड फेक,

पाऊस म्हणजे तरुणाईचा भास
पुसट हिरवं रान शायद त्याचाच आभास..............संदेश प्रताप

आठवणी

पाऊस आला थिजलि वाणी
भिजली आसवं दाटल पाणी,
अर्धी कहाणी, अर्धी गाणी
उरल्या त्या फक्त सार्‍या "आठवणी"................संदेश प्रताप

तू

उगाळण्या दु:ख्खे
हजार असतील माझी,
जगण्या सुख मात्र
एकुलतं एक "तू"...................संदेश प्रताप

Saturday 2 June, 2012

Mother

She is the only girlfriend of yours who never make up for you , neither says " I Love u to you " ....But still your heart goes for her every single moment ......Mother .........Every Boys First girl ....Happy Mothers Days :)

तुझी नि माझी सपनात नजरा नजर काय झाली

तुझी नि माझी सपनात नजरा नजर काय झाली
आजूबाजूच्या दासनीन्का सर्सरावन फुला इली,

सुकलेलि व्हाळी तुडूम भरान गेली
तितक्यात आवशीचे ऐकाक इले गाळी ..............संदेश प्रताप

सरली सये पहाट

सरली सये पहाट
गंधित तुझ्या सवे,
उलगडू दिवस नव्याने
नाते असे जरी जुने...........संदेश प्रताप

केलास वार तू जेव्हा

केलास वार तू जेव्हा
नाते तोडण्याचा,

सुटला गंध सुगंध तेव्हा
जखमी मोगर्‍याचा............संदेश प्रताप

खूप दिवस झाले

खूप दिवस झाले
खास काहीच लिहिलं नाही,

"तुझ्याशिवाय" लिहीण्या सारखं
आताशा काहीच उरलं नाही......................संदेश प्रताप

झिला चार दिशेन उंडार्लस

झिला चार दिशेन उंडार्लस
तरी याक याद राख,

पेज भाकरी नि सुकाट
शेवटी गाव आपला लाख.........संदेश प्रताप

व्हय "मिरग" उतारलो

तीन सांजेची येळ
चुडतान्का धुमी घालीत
म्हातारी डोळे चोळीत
पाय पसरून विस्तारलेलि

भुकेन कोकटणारा बारक्या
...तारपासली घरदारीण
कूळक्षा करीत घोवाचो
सर्गाचि आशा करून नर्कात जावन बसलेलो

पाटल्या दाराक मांगरात
तानेलेला वासरू दाया हिसकावित
गाय हांबरत बिचारी
पेंडिक चघळत

म्हातारो फाटक्या धोतार सावरित
पड्येत उभो विनमस्क
पिंगानी फेरो धरून गुलुपाचो
बव्तेक तेकाच येडाउन दाख्यित

सगळी एकाच चिंतेत
अवन्दा तरी मिरग येळेर येव्चो
हळूच पुटपुटली म्हातारी
"बेगिना धाडलस तर तुपान वात धरीन समोर"

म्हणाची खोटी नि उंबर्‍यारचो दिवो सरभरलो
म्हातारो चमाकलो
म्हातारी सणकण उठली
रडक्या प्वार धावला
घरदारीण हसली

व्हय "मिरग" उतारलो..............................संदेश प्रताप

वेदना

वेदना आज खरी आहे, हास्य खोटे जरी आहे ......संदेश प्रताप

"प्रेम" म्हणजे

"प्रेम" म्हणजे भांगेची नशा, आणि "प्रेमभंग" म्हणजे भांग पिल्यावर होणारी दुसर्या दिवशीची दशा .......संदेश प्रताप

आज पाऊस हिरवा पुन्हा

आज पाऊस हिरवा पुन्हा
तुझा माझा अनुबंध तोच जुना,

का कश्या समजेना मना
उरती निशब्द पाऊल खुणा...............संदेश प्रताप

नसताना तू हूरहुर लावतेस

नसताना तू हूरहुर लावतेस , आठवणींच्या एकोळीत मग आपसूक मावतेस.........संदेश प्रताप

Sunday 20 May, 2012

"सत्यमेव जयते"

आज एका न्यूज़ चॅनेलवरती आमीर खानची मुलाखत पाहिली. त्याच्या नवीन येणार्‍या TV शो "सत्यमेव जयते" च्या जाहिरातीच्या अनुषंगाने ही मुलाखत घेण्यात आली होती. आमिर एक हाडाचा कलावंत म्हणून पुर्विपासून आवडायचा पण आज त्याचा एक वेगळा पैलू पहाण्यास भेटला. त्याची आपल्या कामात झोकून देण्याची वृत्ती, संशोधक स्वभाव , नवीन शिकण्याची उर्मि अन् बरच काही.....मुलाखत चक्क मराठीत होती आणि गेली दीड वर्ष तो मराठी शिकतोय हे... ऐकून खूप आश्चर्य आणि आनंद वाटला पण त्या वेळीच अंतर्मुख झालो एका अमराठी माणसाची मराठी साहित्या वाचण्याच्या हेतूने मराठी भाषा शिकण्याची तळमळ आणि त्याच वेळी आपली मराठी माणसे मात्र आपली माय बोली सोडून लाज वाटते किव्वा हीन पणा वाटतो म्हणून सर्रास हिंग्लिश किव्वा हिंदी भाषांचा सर्रास वापर करतात. "अमराठी" आमिर सरना मानाचा मुजरा .....संदेश प्रताप

प्राजक्त

शुभ्र प्राजक्त धूक्यातला
अजूनही तुलाच आठवतो,

ओलेत्या केसांचा गंध
अजूनही हृदयात साठवतो......

अबोल तुझ्या भावना

अबोल तुझ्या भावना
नकळत बोलक्या व्हायच्या ,

 जेव्हा माझ्यासोबत असताना
पावसाच्या सरी यायच्या....

त्या अवघड वळणावरती अखेर

त्या अवघड वळणावरती अखेर
ती आश्वासक वाट सरली,

 तुझ्या माझ्या नात्यामधे
फक्त खोलवर दरी उरली..................संदेश प्रताप

चला मे म्हयनो इलो.....

चला मे म्हयनो इलो.....

रातीच्या एसटीन गावाक जावया
सॅड्यार जावन कर्न्दा नि चाराबोरा खावया,

फाटफटी उठान चार हाडूक जावया
पारड्यातली चार शेळी काडून खावया,

न्ह्यारयेक सकाळी पेज भाकरी लावया
दोपारच्या कडार नदीत न्हाव्क जावया,

 देव पुजून झाल्यार पीठी भात खावया
पॉट भरून झाल्यार पत्ते कुटुक जावया,

सांचेच्या येळेक ढोरा सोडूक जावया
रातीच्या जेवणाक सुकाट भाजून खावया,

गाजाली मारूक हुनान खळ्यात येवया
आकाशात बघता बघता डाराडूर होवया.........

चला रे मे म्हयनो इलो....अव्न्दा तरी गावाक जावया.....................संदेश प्रताप

त्या पान्दित्सुन येताना

त्या पान्दित्सुन येताना
तिया निसता हसलस,

आवशीच्यान सांगतय
काळजाक हजार येळा डसलस.............संदेश प्रताप

ता हुताच तसा

ता हुताच तसा
बोला भसा भसा,

असला अघळ पघळ
तरी काळीजच जसा

तुझी नि माझी सपनात

तुझी नि माझी सपनात नजरा नजर काय झाली
आजूबाजूच्या दासनीन्का सर्सरावन फुला इली,

सुकलेलि व्हाळी तुडूम भरान गेली
तितक्यात आवशीचे ऐकाक इले गाळी ..............संदेश प्रताप

"जन्नत २" , "इश्क़झादे", आणि "पान सिंग तोमर".

गेल्या चार दिवसात मी ३ चित्रपट पाहिले "जन्नत २" , "इश्क़झादे", आणि "पान सिंग तोमर". तीनही चित्रपट वेगळ्या धाटणीचे .

भट्ट फॅक्टरीचा जन्नत २ नेहमी प्रमाणे मसाला चित्रपट, इम्रान हाशमीचा किलर लुक, ठीकठाक अभिनय आणि अभिनयात पदार्पण करणारी इशा गुप्ता आपल्या जागी योग्य. रणदीप हूडा चा सुडाने पेटलेला पोलीस अधिकारी जबरदस्त. थोडक्यात इम्रानच्या खात्यात एक अजुन हिट दाखल. एकदा पाहायला काहीच हरकत नाही.

इश्क़...झादे , खूप अपेक्षा होत्या प्रोमोस पाहिल्यावर आणि अगदी सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात. थोडासा भडक पण धमाल चित्रपट, पदार्पण करणारा अर्जुन कपूर (बोनी कपूरचा मुलगा ) उत्तम, पहिला चित्रपट असून सुधा कमालीचा सहजपणा , रावडीपणा अगदी मस्त दाखवलाय . परिणीती चोप्रा अप्रतिम बिनधास्त अभिनय, आणि तिचा साधा लुक आणखी उठाव आणतो तिच्या अभिनयामधे. ओवर ऑल बॉलीवूड साठी अजुन एक हिट . नक्की पहा

पान सिंग तोमर , बर्‍याच लोकाना हा चित्रपट माहीत सुद्धा नसेल पण मी ह्या चित्रपटाला ५ स्टार देईन , झक्कास, अप्रतिम , जबरदस्त स्टोरी, अभिनय, आणि एक वेगळा विषय .
हा सत्यघटने वर आधारित चित्रपट आहे. विकिपीडिया मधे डोकावाल तर लक्षात येईल. एक फौजी नॅशनल चॅंपियन धावपटूची ही कहाणी. चंबाळच्या खोर्‍यातून आलेल्या एका गरीब तरुणाची कथा जो उत्तर आयुष्यात शासकीय यंत्रणेला कंटाळून शेवटी डाकु बनतो. इरफान खान -अभिनय म्हणजे काय त्याचे मुर्तिमन्त उदाहरण, जबरदस्त संवाद फेक , थियेटरचा अभिनेता असल्याची पुरेपूर ग्वाही तो देतो. सहज सुंदर अभिनयाची खाण , इतर सगळे अभिनेते /अभिनेत्री पूरक पण आपल्या आपल्या जागी अफाट अभिनयाचा दाखला देतात, दिग्दर्शन, संवाद, एडिटिंग, अगदी सगळं काही बावन काशी.
माहीत नाही हा चित्रपट टॅक्स फ्री झालाय का? पण नक्कीच करावा अशी कलाकृती. ऑस्कर ला जाईल न जाईल , जिंकेल न जिंकेल पण मनाचा वेध घेणारी अफाट कलाकृती .....पान सिंग तोमर .....Salute to unsung heero's of India ...Jai Ho.......संदेश प्रताप

नाते असे जरी जुने

सरली सये पहाट
गंधित तुझ्या सवे,

 उलगडू दिवस नव्याने
नाते असे जरी जुने...........संदेश प्रताप

केलास वार तू जेव्हा

केलास वार तू जेव्हा
नाते तोडण्याचा,

सुटला गंध सुगंध तेव्हा
जखमी मोगर्‍याचा............संदेश प्रताप

"तुझ्याशिवाय"

खूप दिवस झाले
खास काहीच लिहिलं नाही,

"तुझ्याशिवाय" लिहीण्या सारखं
आताशा काहीच उरलं नाही......................संदेश प्रताप

Thursday 10 May, 2012

सांचेच्या येळेक

सांचेच्या येळेक
मांगराच्या पेळेक,
पयली वयली भ्याट
मी लाजलय पन तुझी नजर थेट

काय नि कसा बोला हुतय
... काय्येक कळा नाय हुता,
तुजो एक एक शबुद
डाइरेक्ट काळजात रुता,

तू मातुर एकदम सूपर फास्ट
सुरवाती पासून घेतलस लय भारी स्टार्ट

हडेचा थडेचा बोलान
मूळ मुद्याक हात घातलस,
लगीन करतलस काय रे इचारून
माझा काळीज फाटलस

एका मान्गराचे माका मान्गर दिसाक लागले सात
आनंदान कापरा भरान पायात इलो वात


तितक्यात काचकन
माझो हात तीया धरलस,
बेरकी तुजी नजर
माझ्या तोंडार मारलस

सरपाटणार्‍या घामान केलो माझो घात
नशीब माझा ताठ काळोखान केलो किनाट

तुया पूना हसलस
आंगाशी वेठलस,
गरम गरम उशोश्वास तुझे
एकाच मिठीत हजार येळा भेटलस

थंडगार वारयान दिली माका साथ
मिया सुदा बिनधास्त दिलय हातात हात

अजूनव आठवता ती
पयली वयलि भ्याट
कोणीतरी करणी करून
लावली प्रेमाक आपल्या नाट

असो जेवढा जगलव ता जणू हिरयागार भात
कैक इली कैक गेली नाय करुक अजुन तागत मात.............संदेश प्रताप

चारोळी

आश्रयास जेव्हा नव्हते घरटे
तहानेस नव्हते पाणी,

लिलाव तेव्हा केलास शैय्येचा
अतृप्त श्वापदे जिंकण्या निघाले एका रात्रीची राणी..............संदेश प्रताप

"लफडं"

प्रत्तेकाने प्रेम नावाचं "लफडं" आयुष्यात एकदातरी नक्की करावे,
त्यात एक वेगळीच मजा असते.
त्यात ती असते, तिचा आपल्या पाकिटातून होणारा खर्च असतो, तिची डेंजर माया उर्फ प्रेम असते, तुमचा फुकट जाणारा वेळ असतो.
कधी कधी तर तीचा बाप ही असतो आणि कधी कधी भाऊ सुद्धा.........
पण तुम्ही मात्र त्या कशात नसता....तुम्ही हळूच दुसरीकडे कांदे पोहे हादडत असता.............संदेश प्रताप

त्या पिंपळाच्या पाराखाली

त्या पिंपळाच्या पाराखाली
जीव तुझो माझो होय वरखाली,
जेवा भेटाव चोरून एकामेकाक
तुझी बोटा चाळीत लाजान ओढणेच्या टोकाक,

तुझी नजर भिरभिरत तुझ्या बापाशीक शोधीत
...मी तुका बघता बघता पायान मात्येक खोदित,
खराच आता सारा तेवा नव्हता हाय नि बाय
तुज्या माझ्या सरभरन्यात टाइम निघान जाय

रोज रोज भेटव तरी मन भरा नसा
न बोलता सुदिक घसो खर्खरावन बसा,
आता खय कसला काय जीव लागना नाय
पयल्यासारा काळीज खळखळावन जगना नाय

म्हम्हयच्या चुलत्या न हाडलेलो
तुझो एकुलतो योक ड्रेस,
खुलान दिसा जेवा बांधीस
कचकचावन ओढणी खेच

आता ओढणे नाय रवले
पण तुजी आठवन मातुर रवली,
तू नाय गावलस हुनान काय झाला
तुझी ओढणी जगाक कारण गावली...........संदेश प्रताप

शायद कही !! शायद कभी !!!

शायद कभी वोह लम्हा बेजूबा
जो रूका हुवा है तेरे मेरे बीच मे

बस उसी की आरझु अब
कभी बरस जाए ऐसे
की हर कोई बेजूबा हो जाए

...एक वोह "लम्हा" छोडके... शायद कही !! शायद कभी !!! ...................संदेश प्रताप

"येशील का पुन्हा ?"

"येशील का पुन्हा ?"

एक पावसाची सर हळूच डोकावून काय गेली
आणि पुन्हा आठवणींची लगबग चालू झाली,

आज पाऊस तोच होता, पण तू नव्हतीस
... म्हणूनच की काय थेंबा थेम्बातुन बरसत होतीस,

हळूवार बीलगणारी ती सर अजूनही तशीच अवखळ
पण तुझी छटा नव्हती तिच्यामधे निरागस निखळ,

लोकलच्या खिडकीतून होणारी झर झर अजूनही तशीच हवी हवीशी
आज लोकल ही तीच पण तुझ्या शिवाय वाटे जणू नवी नवीशी,

एकच छत्री, भिजेलेली पायवाट अजूनही तीच
आज तू नाहीस, उरलोय फक्त एकटा माझा मीच,

आज पुन्हा बरसतेय ती वेडी सर नक्की कुणासाठी??
असेलही कुणासाठी?? नसेलही तुझ्या माझ्यासाठी


पण तू येशील का पुन्हा बांधायला सुटलेल्या नात्याच्या गाठी??...............संदेश प्रताप

"पार्थ"

वास्तवाशी झगडण्या
मीपणा समर्थ होता,
जगण्यास मी व्यर्थ
तरी अर्थ होता

एककल्ली जगला
शायद शापित "पार्थ" होता,
मयसभेतील स्त्री अपमान
अर्थपूर्ण स्वार्थ होता..........संदेश प्रताप

शायरी

बेसुरासा हुआ है दिल
तू जाने के बाद,

 ढलते दिन को देखता हू
तो बस आती है तेरी याद.........संदेश प्रताप

बूडबुडा

खोलवर रुतलेलि
पाण्याची पातळी,

पाहणार्‍यास जणू
लख्ख प्रतिबिंबाचा भास,
पण नितळ सौंदर्याच्या
... आत हजार जखमा

मग कुठूनसा तरी
हळूच एक "बूडबुडा",
उगाच प्रयत्न करतो
बहुतेक यातना दाखविण्याचा?

पण जखमांचा खोलवरपणा
तितकाचा हेकट,
आगतिकपणे लढणारा तो सुद्धा
हार मानून मिसळून जातो

आणि राहते ते फक्त नितळ पाणी..............संदेश प्रताप

चारोळी

कवटाळुनी काही कवडसे
केले यत्न आयुष्य मांडण्याचे,
शापित चंद्र जणू मी
झाले वार शरद चांदण्याचे..........संदेश प्रताप

चारोळी

शुभ्र प्राजक्त धूक्यातला
अजूनही तुलाच आठवतो,

ओलेत्या केसांचा गंध
अजूनही हृदयात साठवतो......

चारोळी

अबोल तुझ्या भावना
नकळत बोलक्या व्हायच्या,

जेव्हा माझ्यासोबत असताना
पावसाच्या सरी यायच्या....

चारोळी

त्या अवघड वळणावरती अखेर
ती आश्वासक वाट सरली,
तुझ्या माझ्या नात्यामधे
फक्त खोलवर दरी उरली..................संदेश प्रताप

Saturday 28 April, 2012

पल्याड डोंगरामधी दूर
माझा गाव दाटलेला,
रानावना पानाफुला मधी
कण कण साठलेला

जरी मी दूर देशी
...मन गावाच्याच वेशी,
आकाशीच्या घारीची आस
घरट्या वर जशी

डोळ्याला दिवे लावून
माझी माय दाराशी,
कणखर बाप माझा
दु:ख्ख लपवी उराशी

माझा गाव माझा प्राण
हरपुनी जाई भान,
जेव्हा येई आठवण
डोळे गाती त्याच गाणं..............संदेश प्रताप
See More

Friday 17 February, 2012

माझ्या काही एकोळ्या

भर गर्दीत माझा "विठ्ठल" एकाकी!!!!

*******************************
सकाळी सकाळी न कंटाळता बिनबोभाट उठणे ही सुद्धा एक कलाच आहे .

*****************************************************
शेवटची एकोळी थेट काळजातून, तिच्यासाठी "निशब्द" :(

********************************************
स्वप्नांच्या गावी..........मी परका

***************************
हल्ली मला झोपायचा सुद्धा कंटाळा येतो, तरी पण झोपतोय तुझ्यासाठी.

********************************************************
धुक आवडतं आपल्याला, सगळं कसं अस्पष्ट...दूर कुठेतरी.

********************************************
जेव्हा मोगरा दरवळला, मी पुन्हा एकदा पडलो नेहमी प्रमाणे ##प्रेमात##

*****************************************************
आता त्याच क्षणाची वाट पहात बसणार, बाकीच्या क्षणाना बाजूला सारून.

******************************************************
‎"वास्तव" आणि "विस्तव" गुणधर्म सारखाच, दोघेही जाळून टाकतात.

*******************************************************
‎"औषध" आणि "स्वभाव" अगदी सारखेच हळू हळू आपला प्रभाव पाडतात.

*********************************************************
लोक एक "तोंड" असून "दुतोंडी" कशी वागतात , स्वभाव आणि काय???.

**********************************************************
काही क्षण नुसते मनात नाही ठेवायचे, एकमेकानसोबत पुरेपूर उपभोगायचे

**************************************************************
मी सुद्धा हसलो होतो, माहीत नाही केव्हा???

**************************************
क्षण नेहमीच विसंगत वागतात, पण फक्त माझ्याशीच !!

**********************************************
प्रेमाची व्याख्या थोडीशी बदलावी म्हणतोय मी, आई बाबा भाऊ बहीण.

******************************************************
हृदय म्हणतात तुटण्यासाठी असते, कधी प्रेमात तर कधी प्रेमावाचून तुटते.

*******************************************************
प्रेमात गुंतून माझा पुरता गुंतावळा झालाय खरा !!!!!

*****************************************
पूर्ण वाढलेला मी, ह्या कॉंपिटिशनच्या गर्दीत अक्षरशः माझा "बोन्साई" झालाय.

************************************************************
तुझं माझं नातं, एका ओळीत संपूर्ण.

******************************
उधारीचं हसू आणून , खूप काही बोलायचय मला एकदम "रोखठोक".

*****************************************************
आज बोचरया गारव्यापेक्षा बोचतय तुझं नसण #माझ्या सोबत# :(

*****************************************************
काही आठवणी भळभळत्या जखमेसारख्या , खपली धरण्याचे नाव घेत नाहीत.

***********************************************************
त्यांची महती लिहिताना , शब्दानाही भाले फुटतात,
नुसता त्यांचा इतिहास वाचून, स्फूर्तीची वादळे उठतात,

जय हो छत्रपती............."राजे तेव्हा तुम्ही नसता तर "शायद" आज आमची पीढी नसती"
आराध्य दैवत गणपती बाप्पा नंतर अशी एकच जागा जिथे आमच्या भावना अतूट आदराने नतमस्तक होतात.


# जयंती निमित्त विनम्र अभिवादन#
*********************************************************************************
साला सुट्याला सुद्धा सूटटे कमी पडायचे, नेहमीच पानपट्टीवाल्या भैय्याकडे २५ पैसे उधार राहायचे .

*************************************************************************
मित्रांसोबत एक "सुटटा" छोट्या गोल्डफेकचा, कट्यावरती, अजूनही रेंगाळतोय काळजात.

********************************************************************
साध सरळ गणित आहे , उत्तर मिळालं की प्रश्नांच महत्व संपलं.

***************************************************
अचानक कोणतरी आवडायला लागलय, हृदय पुन्हा मनाशी दुष्टपणे वागलय

************************************************************

फुटक्या कौलातुन गळणारया पावसाला विचार, माझ्या "फाटक्या" नशिबाबद्दल, तो सुद्धा अखंड रडतो बिच्चारा

*********************************************************************************
तोच बेभान वारा , त्याच श्रावण धारा.....फक्त तूच नव्हतीस :(

***************************************************
जगण्यातलं गांभीर्य हसत खेळत अनुभवायचं

*****************************************
कधी एकटं जगून तर बघ, वेगळाच कैफ

***********************************
तुझी "माया" धारदार साजणी, मी जखमी "रक्तबंबाळ

***********************************************
मी कोणाच्या बापाला भीत नाही फक्त "माझ्या सोडून"

**********************************************
माझ्या आयुष्यात उठलेले वादळ मी चक्क "पेल्यात" शमवले

****************************************************
माय माझी, तिची महती एका ओळीत, "अशक्यप्राय"..................

******************************************************





"रानभूल" जणू तुझं माझं नातं, निरंतर तरीही नकळत हरवून बसणारं....
*******************************************************
जखमा तुझ्या मनाशी, लपविल्या तू उराशी, दिसली यातना जेव्हा हसलिस तू जराशी....
****************************************************************
रंग बाहुल्यांचा खेळ जणू तुझ्या माझ्या हळूवार सावल्यांचा....
***************************************************
काहीजण आयुष्यातला गंभीरपणा फेसबुकवर लादतात , उगाच खोटे प्रगल्भ असल्यागत वागतात.......
****************************************************************************
साजणी धारदार तुझ्या लावण्याची पात, झाले थेट वार काळजात ......
****************************************************
माझा श्वास तुझ्याशी जणू प्राजक्त, मी तुझ्यात सामावून सुद्धा विरक्त .........
*********************************************************
इवल्याश्या क्षणांमधे अख्खं आयुष्य देतेस जेव्हा तू पुन्हा पुन्हा येतेस.......
***********************************************************
लोग कहते है हमे आदत है मुस्कुराने की
वोह भी क्या जाने ये अदा है "गम" छुपाने की........
********************************************************
बेधुन्द असावीस अशीच आहेस तू
जगण्याला कारण अशीच आहेस तू...........
********************************************************
पहिल्या पावसाचा पहिला थेंब तसा साधारणच पण तहानलेल्या चातकाच्या दृष्टीकोनातून अनन्य साधारण....
*********************************************************************************
मेरे दरमियाँ तेरी आहटे, तेरी चाहते ......
जुदा होके भी बस तेरी आहटे .........
*******************************************************************
एकाच ओळीत स्पर्श व्हावा थेट हृदयाला , उतरु दे असं काहीतरी मनातून , भिडूदे थेट काळजाला.....
**************************************************************************
आर्जवे तुझ्या नयनी पाहुनि मी हेलावलो होतो तेव्हा,
मन मानत नसताना मेंदूने मात केली जेव्हा
****************************************************************
तुझ्या "अहो" च्या प्रत्येक हाकेला मला माझी अस्तित्वाची जाणीव होते...
***********************************************************
रात्र वेडी साक्षीला, बहर तुझ्या माझ्या प्रीतीला.......
*****************************************************
बहाणा तुझा "कारण" बनून गेला जगण्यासाठी आयुष्य...
***************************
जमलच तर माझी आठवण काढ, भिजलेल्या केसाना सुकवताना, वाफळत्या कटिंग चहाला ओठी लावताना ..जमलच तर...संदेश प्रताप
***************************************************************************
असं लिहा की स्पर्श होऊदे आकाशाच्या अफाट सामर्थ्याचा, ठाव घेऊ दे मनाच्या सजगतेचा.....संदेश प्रताप
******************************************************************************
प्राजक्त नेहमीच सुखावतो मला जेव्हा भल्या पहाटे धुक्याच्या सोबतीने वेचतेस तू तेव्हा.....संदेश प्रताप
********************************************************************************
मी म्हटलं बनशील का माझी?, तर ती चक्क मला "बनेल" म्हणाली......
*************************************************************************
बरसणार्‍या बेधुन्द सरीला विचार, थेंबा थेंबा वरती फक्त तुझच नाव .......संदेश प्रताप
******************************************************************
तू गेलीस तेव्हा "मोगरा" सुद्धा कोमेजला, उरला तो फक्त त्याचा गंध श्वासा मध्धे तुझ्या आठवणीं सोबत ...संदेश प्रताप
***********************************************************************
तुझ्यापासून दूर तरीही तुझ्या जवळ मी, फक्त एका एकोळीच्या दुरीवर ....संदेश प्रताप
*************************************************************************
बेभान करणारे क्षण आयुष्यात विरळच, असतील ते तुझ्यासाठीच .......संदेश प्रताप
***************************************************************************
मैत्र तुझे माझे, शब्दांच्या ही पलीकडचे...संदेश प्रताप
*********************************************
काही गोष्टी खरच हातात नसतात, वेळ हेच साधन.......संदेश प्रताप
****************************************************
चिल्ड बियर भारी, सोबत दोस्ती यारी, हीच आमची "दुनियादारी"..........संदेश प्रताप
******************************************************************
साहित्याच्या जगात सगळेच जेष्ठ, मी "बिचारा" फक्त माझ्या कलेशी एकनिष्ठ..........संदेश प्रताप
***************************************************************************
दोन थेंब तुझे पापण्यातून निसटलेले....माझे विश्वच जणू निसटून गेले......संदेश प्रताप
*****************************************************************
आज तू नव्याने भेटलीस, थेट काळजाला खेटलीस :):):.........संदेश प्रताप
***************************************************************
बोलायचं खूप असतं, अगदी खूप सारं ठरवून येतो, पण तू समोर आलिस सगळं विसरून जातो .......संदेश प्रताप
**********************************************************************************
का बा जाऊ पंढरपुरी ?, माझा विठ्ठल मायबाप.............संदेश प्रताप
**********************************************************************
माझ्या मनाशी जगून तर बघ , माझ्या उराशी लागून तर बघ, आयुष्यभर राहशील फक्त माझ्यासोबत....संदेश प्रताप
**********************************************************************************
आठवणी मनाला सुखावतात हे मान्य, पण तू समोर असताना त्याना कवटाळुन जगायाच हे अमान्य....संदेश प्रताप...
********************************************************************************
काही वेळा मी पूर्ण वेळ ऑफीस मधे बिझी असतो ते आज मला कळलं :):):) .........संदेश प्रताप
*********************************************************************
कालच ती मला म्हणाली "तुझ्या एकोळया किती मस्त असतात रे? , कसं समजावू तिला त्या तिच्या समोर न मांडता येणार्‍या तिच्यासाठीच्या भावना असतात..............संदेश प्रताप
*******************************************************************************
मी माझ्याशीच खोटं बोलतोय, जीव जडलाय तुझ्यावर तरी उगाच नाही नाही म्हणतोय .........संदेश प्रताप
*********************************************************************************
तुझ्या वाटेवरच्या मोगार्‍याची शप्पथ, पुन्हा असा दुरावा होणे नाही.......संदेश प्रताप
********************************************************************
गंध तुझ्या मिठीचा, ओलेत्या स्पर्शाचा क्षणभर झाला , छंद जीवा मात्र "आयुष्यभर" लावून गेला.........संदेश प्रताप
**********************************************************************************
तुझं नुसतं असणं मन सुखवतं, तुझं खूप वेळ नसणं....विचार सुद्धा नाही करवत बघ.......संदेश प्रताप
*****************************************************************************
तुझं निशब्द वागणं समजू लागलय, तुझं विना तक्रार वाट बघण उमजू लागलय.....संदेश प्रताप
************************************************************************
दाटून आलेल्या अनोळखी राती मी ओळखीच्या "सावल्या" शोधीत..............संदेश प्रताप
********************************************************************
वाटतय खूप सारं बोलावं डोळ्याना टिपत एकमेकांच्या , बोलणं आपलं आयुष्यभर ना सराव....संदेश प्रताप
*******************************************************************************
गुलमोहोर आठवला की आठवते तुझीच कूस , तुझ्या मायेचा नेहमी भरभरून सुवास देणारी.....संदेश प्रताप
*******************************************************************************
कोणावर लाइन मारायची असल्यास "सरळ" मारावी, म्हणजे समोरच्याला त्यात काही "वाकडं" वाटणार नाही ......संदेश प्रताप :P:P
******************************************************************************
प्रत्तेक क्षणात आता सोबत तुझी हवी, अगणित असे क्षण गुंफून आयुष्य जोडुन जावी......संदेश प्रताप
****************************************************************************
कवटाळुन काही आठवणी उराशी, ये जगून तर बघ मला जराशी.....संदेश प्रताप
****************************************************************
एकोळीच्या दुनियेत "तू" आणि "मी" जगतोय "एक" होण्यासाठी ....संदेश प्रताप
**************************************************************
न बोलता जगतो मी तुला, खूप काही बोलायचय , काही शब्द उसने देशील का मला?..संदेश प्रताप
***************************************************************************
नातं तुझं माझं "संपून" सुद्धा न संपणारं, कवडीची ही अपेक्षा न बाळगता अविरत "माया" लावणारं......संदेश प्रताप
********************************************************************************
धुंद वारा , समोर अफाट समुद्र , गरजणार्‍या लाटा....आणि सोबत तू..........अजुन काय पाहिजे ?? ...संदेश प्रताप
********************************************************************************
तुझं शांत शांत राहाणं मला "अशांत" बनवतं......संदेश प्रताप
******************************************************************************
तू जणू अचानक आलेली खट्याळ पावसाची सर आयुष्यात........निघून जाण्यासाठी.............संदेश प्रताप
*******************************************************************************
फाटलेल्या पदरान जेवा तू तुझी धुका हळूच पुसलस तेव्हा माझा काळीज चर्र :(:(......संदेश प्रताप
****************************************************************************
तुझ्याशिवाय एकोळी म्हणजे उगाच मांडलेले काही निरर्थक शब्द.......संदेश प्रताप
*******************************************************************
उरलेल्या रात्रीची शप्पथ, ती सुद्धा तुझ्याच आठवणींच्या कुशीत जाईल.............संदेश प्रताप
***********************************************************************
प्रीत माझी साजणी, लाखात एक .,,,,,,संदेश प्रताप
**************************************************
तुझ्या स्पर्शाचा "कैफ" देतोय मोगर्‍याचा सुगंध .................संदेश प्रताप
************************************************************
मी म्हणतो कधी कधी असावा दुरावा, एक एक क्षण युगांसारखा सरावा, प्रीतीला ही मग अजुन बहर यावा.............संदेश प्रताप
***************************************************************************
क्षणभर झालेल्या नजर भेटीत अख्ख आयुष्य दिसलं माझं ...........संदेश प्रताप
**************************************************************************
सागराशी एकरूप होण्यासाठी किनार्‍याची ओढ हवी........संदेश प्रताप
**************************************************************
जेव्हा तुला आठवतो तेव्हा मी तुझ्यासारखा हसतो, तुझ्यासारखा रुसतो, शेवटी मी म्हणजे तूच ना???...........संदेश प्रताप
*************************************************************************
तुझ्याशी गुंतली माझी एकोळी साक्ष तिला ह्या रातीची, आठवण तुझी येतेय भर तिला भिरभीरणार्‍या वातीची........संदेश प्रताप
**************************************************************************
चांदणीची सोबत फक्त एका रात्री पुरती, तुझ्या सोबत अगणित राती सरती..........संदेश प्रताप
****************************************************************************
व्यवसायिक जीवनाचा अतिरेक, आज 'आई' असून 'आई' म्हणायला जवळ 'आई' नाही
:(...........संदेश प्रताप
************************************************************************
कॉलेजची मैत्री अगदी नसानसात भिनलेली, छोट्या "गोल्डफेकच्या" धुरासारखी काळजात भिनलेली.......संदेश प्रताप
********************************************************************************
वास्तवाला छेद देणं म्हणजे काय, ह्याचं समर्पक उदाहरण म्हणजे "मी" स्वतः............संदेश प्रताप
*****************************************************************************
शब्द बिच्चारा साधा सरळ, वळण देणारे आपण ...............संदेश
**************************************************************************
आज पुन्हा पाऊस, पुन्हा तोच मृदूगंध , तुझ्या गाठी, तुझे आठवणींचे बंध :(............संदेश प्रताप
*************************************************************************
लाख समजवल मनाला साजणी, पण लाखात एक तूच फक्त.........संदेश प्रताप
*****************************************************************
उधारीचं हसू आणून , खूप काही बोलायचय मला एकदम "रोखठोक"................संदेश प्रताप
*********************************************************************
अचानक कोणतरी आवडायला लागलय, हृदय पुन्हा मनाशी दुष्टपणे वागलय............संदेश
************************************************************************
माय माझी, तिची महती एका ओळीत, "अशक्यप्राय"..................संदेश
******************************************************************
सकाळी सकाळी न कंटाळता बिनबोभाट उठणे ही सुद्धा एक कलाच आहे .............."सुप्रभात"...संदेश
***************************************************************************
शेवटची एकोळी थेट काळजातून, तिच्यासाठी "निशब्द" :(.........शुभ रात्री :):)...संदेश
*******************************************************************
काल अचानक पाऊस आला, आठवणींचा व्रण पुन्हा ओला झाला......संदेश प्रताप
********************************************************************
काही ऋतू तुझे माझे पावसाचे न मावणारे, साठवावे म्हणतो मी फाटक्या ओंजळीत :(......संदेश प्रताप
****************************************************************************
जेव्हा वाजते तुझी पैजण छनछन, जाणवते तुझ्या परिस्थितीची चणचण........संदेश प्रताप
*************************************************************************

"रानभूल" जणू तुझं माझं नातं, निरंतर तरीही नकळत हरवून बसणारं....संदेश प्रताप
**********************************************************************
जखमा तुझ्या मनाशी, लपविल्या तू उराशी, दिसली यातना जेव्हा हसलिस तू जराशी......संदेश प्रताप
***************************************************************************
रंग बाहुल्यांचा खेळ जणू तुझ्या माझ्या हळूवार सावल्यांचा..........संदेश प्रताप :):)
***********************************************************************

काहीजण आयुष्यातला गंभीरपणा फेसबुकवर लादतात , उगाच खोटे प्रगल्भ असल्यागत वागतात............संदेश प्रताप
***********************************************************************