Sunday 10 June, 2012

पहिला पाऊस

तुझं माझं नातं पहिलं पहिलं
भर पावसात डोळ्यात भरून राहिलं,

तू म्हणालिस आज पाऊस आला
पण खटकल तुझं नसणं,
मी हसून म्हणालो मग काय झाल?
... मला भावलं तुझं असं रुसण

तशीच फोन वर तू उगाच चिडलीस
"आता किती दिवस असं जगायचं"
चिडल्यावर तू अजुन सुंदर दिसतेस्
म्हणून का चिडून वागायचं?

पावसाची झर झर तशीच चाललेली
त्याची झळ मला दूरवर काळजात लागलेली,
"पुढच्या पावसात तर आपण सोबत असू?"
"खरच रे एकमेकाच्या मिठीत भान हरवून बसू"

आपल्या नात्याचा पहिला पाऊस असाच पडला
पहिला दूराव्याने रडला, अन् मग दूराव्याशी लढला

पहिला पाऊस तुझ्या पासून दूर
खूप काही सांगून गेला,
रोम रोमात स्पर्शून
हळूवार काळजातून रांगून गेला.......................संदेश प्रताप

No comments:

Post a Comment