Sunday 20 May, 2012

"सत्यमेव जयते"

आज एका न्यूज़ चॅनेलवरती आमीर खानची मुलाखत पाहिली. त्याच्या नवीन येणार्‍या TV शो "सत्यमेव जयते" च्या जाहिरातीच्या अनुषंगाने ही मुलाखत घेण्यात आली होती. आमिर एक हाडाचा कलावंत म्हणून पुर्विपासून आवडायचा पण आज त्याचा एक वेगळा पैलू पहाण्यास भेटला. त्याची आपल्या कामात झोकून देण्याची वृत्ती, संशोधक स्वभाव , नवीन शिकण्याची उर्मि अन् बरच काही.....मुलाखत चक्क मराठीत होती आणि गेली दीड वर्ष तो मराठी शिकतोय हे... ऐकून खूप आश्चर्य आणि आनंद वाटला पण त्या वेळीच अंतर्मुख झालो एका अमराठी माणसाची मराठी साहित्या वाचण्याच्या हेतूने मराठी भाषा शिकण्याची तळमळ आणि त्याच वेळी आपली मराठी माणसे मात्र आपली माय बोली सोडून लाज वाटते किव्वा हीन पणा वाटतो म्हणून सर्रास हिंग्लिश किव्वा हिंदी भाषांचा सर्रास वापर करतात. "अमराठी" आमिर सरना मानाचा मुजरा .....संदेश प्रताप

प्राजक्त

शुभ्र प्राजक्त धूक्यातला
अजूनही तुलाच आठवतो,

ओलेत्या केसांचा गंध
अजूनही हृदयात साठवतो......

अबोल तुझ्या भावना

अबोल तुझ्या भावना
नकळत बोलक्या व्हायच्या ,

 जेव्हा माझ्यासोबत असताना
पावसाच्या सरी यायच्या....

त्या अवघड वळणावरती अखेर

त्या अवघड वळणावरती अखेर
ती आश्वासक वाट सरली,

 तुझ्या माझ्या नात्यामधे
फक्त खोलवर दरी उरली..................संदेश प्रताप

चला मे म्हयनो इलो.....

चला मे म्हयनो इलो.....

रातीच्या एसटीन गावाक जावया
सॅड्यार जावन कर्न्दा नि चाराबोरा खावया,

फाटफटी उठान चार हाडूक जावया
पारड्यातली चार शेळी काडून खावया,

न्ह्यारयेक सकाळी पेज भाकरी लावया
दोपारच्या कडार नदीत न्हाव्क जावया,

 देव पुजून झाल्यार पीठी भात खावया
पॉट भरून झाल्यार पत्ते कुटुक जावया,

सांचेच्या येळेक ढोरा सोडूक जावया
रातीच्या जेवणाक सुकाट भाजून खावया,

गाजाली मारूक हुनान खळ्यात येवया
आकाशात बघता बघता डाराडूर होवया.........

चला रे मे म्हयनो इलो....अव्न्दा तरी गावाक जावया.....................संदेश प्रताप

त्या पान्दित्सुन येताना

त्या पान्दित्सुन येताना
तिया निसता हसलस,

आवशीच्यान सांगतय
काळजाक हजार येळा डसलस.............संदेश प्रताप

ता हुताच तसा

ता हुताच तसा
बोला भसा भसा,

असला अघळ पघळ
तरी काळीजच जसा

तुझी नि माझी सपनात

तुझी नि माझी सपनात नजरा नजर काय झाली
आजूबाजूच्या दासनीन्का सर्सरावन फुला इली,

सुकलेलि व्हाळी तुडूम भरान गेली
तितक्यात आवशीचे ऐकाक इले गाळी ..............संदेश प्रताप

"जन्नत २" , "इश्क़झादे", आणि "पान सिंग तोमर".

गेल्या चार दिवसात मी ३ चित्रपट पाहिले "जन्नत २" , "इश्क़झादे", आणि "पान सिंग तोमर". तीनही चित्रपट वेगळ्या धाटणीचे .

भट्ट फॅक्टरीचा जन्नत २ नेहमी प्रमाणे मसाला चित्रपट, इम्रान हाशमीचा किलर लुक, ठीकठाक अभिनय आणि अभिनयात पदार्पण करणारी इशा गुप्ता आपल्या जागी योग्य. रणदीप हूडा चा सुडाने पेटलेला पोलीस अधिकारी जबरदस्त. थोडक्यात इम्रानच्या खात्यात एक अजुन हिट दाखल. एकदा पाहायला काहीच हरकत नाही.

इश्क़...झादे , खूप अपेक्षा होत्या प्रोमोस पाहिल्यावर आणि अगदी सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात. थोडासा भडक पण धमाल चित्रपट, पदार्पण करणारा अर्जुन कपूर (बोनी कपूरचा मुलगा ) उत्तम, पहिला चित्रपट असून सुधा कमालीचा सहजपणा , रावडीपणा अगदी मस्त दाखवलाय . परिणीती चोप्रा अप्रतिम बिनधास्त अभिनय, आणि तिचा साधा लुक आणखी उठाव आणतो तिच्या अभिनयामधे. ओवर ऑल बॉलीवूड साठी अजुन एक हिट . नक्की पहा

पान सिंग तोमर , बर्‍याच लोकाना हा चित्रपट माहीत सुद्धा नसेल पण मी ह्या चित्रपटाला ५ स्टार देईन , झक्कास, अप्रतिम , जबरदस्त स्टोरी, अभिनय, आणि एक वेगळा विषय .
हा सत्यघटने वर आधारित चित्रपट आहे. विकिपीडिया मधे डोकावाल तर लक्षात येईल. एक फौजी नॅशनल चॅंपियन धावपटूची ही कहाणी. चंबाळच्या खोर्‍यातून आलेल्या एका गरीब तरुणाची कथा जो उत्तर आयुष्यात शासकीय यंत्रणेला कंटाळून शेवटी डाकु बनतो. इरफान खान -अभिनय म्हणजे काय त्याचे मुर्तिमन्त उदाहरण, जबरदस्त संवाद फेक , थियेटरचा अभिनेता असल्याची पुरेपूर ग्वाही तो देतो. सहज सुंदर अभिनयाची खाण , इतर सगळे अभिनेते /अभिनेत्री पूरक पण आपल्या आपल्या जागी अफाट अभिनयाचा दाखला देतात, दिग्दर्शन, संवाद, एडिटिंग, अगदी सगळं काही बावन काशी.
माहीत नाही हा चित्रपट टॅक्स फ्री झालाय का? पण नक्कीच करावा अशी कलाकृती. ऑस्कर ला जाईल न जाईल , जिंकेल न जिंकेल पण मनाचा वेध घेणारी अफाट कलाकृती .....पान सिंग तोमर .....Salute to unsung heero's of India ...Jai Ho.......संदेश प्रताप

नाते असे जरी जुने

सरली सये पहाट
गंधित तुझ्या सवे,

 उलगडू दिवस नव्याने
नाते असे जरी जुने...........संदेश प्रताप

केलास वार तू जेव्हा

केलास वार तू जेव्हा
नाते तोडण्याचा,

सुटला गंध सुगंध तेव्हा
जखमी मोगर्‍याचा............संदेश प्रताप

"तुझ्याशिवाय"

खूप दिवस झाले
खास काहीच लिहिलं नाही,

"तुझ्याशिवाय" लिहीण्या सारखं
आताशा काहीच उरलं नाही......................संदेश प्रताप

Thursday 10 May, 2012

सांचेच्या येळेक

सांचेच्या येळेक
मांगराच्या पेळेक,
पयली वयली भ्याट
मी लाजलय पन तुझी नजर थेट

काय नि कसा बोला हुतय
... काय्येक कळा नाय हुता,
तुजो एक एक शबुद
डाइरेक्ट काळजात रुता,

तू मातुर एकदम सूपर फास्ट
सुरवाती पासून घेतलस लय भारी स्टार्ट

हडेचा थडेचा बोलान
मूळ मुद्याक हात घातलस,
लगीन करतलस काय रे इचारून
माझा काळीज फाटलस

एका मान्गराचे माका मान्गर दिसाक लागले सात
आनंदान कापरा भरान पायात इलो वात


तितक्यात काचकन
माझो हात तीया धरलस,
बेरकी तुजी नजर
माझ्या तोंडार मारलस

सरपाटणार्‍या घामान केलो माझो घात
नशीब माझा ताठ काळोखान केलो किनाट

तुया पूना हसलस
आंगाशी वेठलस,
गरम गरम उशोश्वास तुझे
एकाच मिठीत हजार येळा भेटलस

थंडगार वारयान दिली माका साथ
मिया सुदा बिनधास्त दिलय हातात हात

अजूनव आठवता ती
पयली वयलि भ्याट
कोणीतरी करणी करून
लावली प्रेमाक आपल्या नाट

असो जेवढा जगलव ता जणू हिरयागार भात
कैक इली कैक गेली नाय करुक अजुन तागत मात.............संदेश प्रताप

चारोळी

आश्रयास जेव्हा नव्हते घरटे
तहानेस नव्हते पाणी,

लिलाव तेव्हा केलास शैय्येचा
अतृप्त श्वापदे जिंकण्या निघाले एका रात्रीची राणी..............संदेश प्रताप

"लफडं"

प्रत्तेकाने प्रेम नावाचं "लफडं" आयुष्यात एकदातरी नक्की करावे,
त्यात एक वेगळीच मजा असते.
त्यात ती असते, तिचा आपल्या पाकिटातून होणारा खर्च असतो, तिची डेंजर माया उर्फ प्रेम असते, तुमचा फुकट जाणारा वेळ असतो.
कधी कधी तर तीचा बाप ही असतो आणि कधी कधी भाऊ सुद्धा.........
पण तुम्ही मात्र त्या कशात नसता....तुम्ही हळूच दुसरीकडे कांदे पोहे हादडत असता.............संदेश प्रताप

त्या पिंपळाच्या पाराखाली

त्या पिंपळाच्या पाराखाली
जीव तुझो माझो होय वरखाली,
जेवा भेटाव चोरून एकामेकाक
तुझी बोटा चाळीत लाजान ओढणेच्या टोकाक,

तुझी नजर भिरभिरत तुझ्या बापाशीक शोधीत
...मी तुका बघता बघता पायान मात्येक खोदित,
खराच आता सारा तेवा नव्हता हाय नि बाय
तुज्या माझ्या सरभरन्यात टाइम निघान जाय

रोज रोज भेटव तरी मन भरा नसा
न बोलता सुदिक घसो खर्खरावन बसा,
आता खय कसला काय जीव लागना नाय
पयल्यासारा काळीज खळखळावन जगना नाय

म्हम्हयच्या चुलत्या न हाडलेलो
तुझो एकुलतो योक ड्रेस,
खुलान दिसा जेवा बांधीस
कचकचावन ओढणी खेच

आता ओढणे नाय रवले
पण तुजी आठवन मातुर रवली,
तू नाय गावलस हुनान काय झाला
तुझी ओढणी जगाक कारण गावली...........संदेश प्रताप

शायद कही !! शायद कभी !!!

शायद कभी वोह लम्हा बेजूबा
जो रूका हुवा है तेरे मेरे बीच मे

बस उसी की आरझु अब
कभी बरस जाए ऐसे
की हर कोई बेजूबा हो जाए

...एक वोह "लम्हा" छोडके... शायद कही !! शायद कभी !!! ...................संदेश प्रताप

"येशील का पुन्हा ?"

"येशील का पुन्हा ?"

एक पावसाची सर हळूच डोकावून काय गेली
आणि पुन्हा आठवणींची लगबग चालू झाली,

आज पाऊस तोच होता, पण तू नव्हतीस
... म्हणूनच की काय थेंबा थेम्बातुन बरसत होतीस,

हळूवार बीलगणारी ती सर अजूनही तशीच अवखळ
पण तुझी छटा नव्हती तिच्यामधे निरागस निखळ,

लोकलच्या खिडकीतून होणारी झर झर अजूनही तशीच हवी हवीशी
आज लोकल ही तीच पण तुझ्या शिवाय वाटे जणू नवी नवीशी,

एकच छत्री, भिजेलेली पायवाट अजूनही तीच
आज तू नाहीस, उरलोय फक्त एकटा माझा मीच,

आज पुन्हा बरसतेय ती वेडी सर नक्की कुणासाठी??
असेलही कुणासाठी?? नसेलही तुझ्या माझ्यासाठी


पण तू येशील का पुन्हा बांधायला सुटलेल्या नात्याच्या गाठी??...............संदेश प्रताप

"पार्थ"

वास्तवाशी झगडण्या
मीपणा समर्थ होता,
जगण्यास मी व्यर्थ
तरी अर्थ होता

एककल्ली जगला
शायद शापित "पार्थ" होता,
मयसभेतील स्त्री अपमान
अर्थपूर्ण स्वार्थ होता..........संदेश प्रताप

शायरी

बेसुरासा हुआ है दिल
तू जाने के बाद,

 ढलते दिन को देखता हू
तो बस आती है तेरी याद.........संदेश प्रताप

बूडबुडा

खोलवर रुतलेलि
पाण्याची पातळी,

पाहणार्‍यास जणू
लख्ख प्रतिबिंबाचा भास,
पण नितळ सौंदर्याच्या
... आत हजार जखमा

मग कुठूनसा तरी
हळूच एक "बूडबुडा",
उगाच प्रयत्न करतो
बहुतेक यातना दाखविण्याचा?

पण जखमांचा खोलवरपणा
तितकाचा हेकट,
आगतिकपणे लढणारा तो सुद्धा
हार मानून मिसळून जातो

आणि राहते ते फक्त नितळ पाणी..............संदेश प्रताप

चारोळी

कवटाळुनी काही कवडसे
केले यत्न आयुष्य मांडण्याचे,
शापित चंद्र जणू मी
झाले वार शरद चांदण्याचे..........संदेश प्रताप

चारोळी

शुभ्र प्राजक्त धूक्यातला
अजूनही तुलाच आठवतो,

ओलेत्या केसांचा गंध
अजूनही हृदयात साठवतो......

चारोळी

अबोल तुझ्या भावना
नकळत बोलक्या व्हायच्या,

जेव्हा माझ्यासोबत असताना
पावसाच्या सरी यायच्या....

चारोळी

त्या अवघड वळणावरती अखेर
ती आश्वासक वाट सरली,
तुझ्या माझ्या नात्यामधे
फक्त खोलवर दरी उरली..................संदेश प्रताप