Sunday 20 May, 2012

"जन्नत २" , "इश्क़झादे", आणि "पान सिंग तोमर".

गेल्या चार दिवसात मी ३ चित्रपट पाहिले "जन्नत २" , "इश्क़झादे", आणि "पान सिंग तोमर". तीनही चित्रपट वेगळ्या धाटणीचे .

भट्ट फॅक्टरीचा जन्नत २ नेहमी प्रमाणे मसाला चित्रपट, इम्रान हाशमीचा किलर लुक, ठीकठाक अभिनय आणि अभिनयात पदार्पण करणारी इशा गुप्ता आपल्या जागी योग्य. रणदीप हूडा चा सुडाने पेटलेला पोलीस अधिकारी जबरदस्त. थोडक्यात इम्रानच्या खात्यात एक अजुन हिट दाखल. एकदा पाहायला काहीच हरकत नाही.

इश्क़...झादे , खूप अपेक्षा होत्या प्रोमोस पाहिल्यावर आणि अगदी सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात. थोडासा भडक पण धमाल चित्रपट, पदार्पण करणारा अर्जुन कपूर (बोनी कपूरचा मुलगा ) उत्तम, पहिला चित्रपट असून सुधा कमालीचा सहजपणा , रावडीपणा अगदी मस्त दाखवलाय . परिणीती चोप्रा अप्रतिम बिनधास्त अभिनय, आणि तिचा साधा लुक आणखी उठाव आणतो तिच्या अभिनयामधे. ओवर ऑल बॉलीवूड साठी अजुन एक हिट . नक्की पहा

पान सिंग तोमर , बर्‍याच लोकाना हा चित्रपट माहीत सुद्धा नसेल पण मी ह्या चित्रपटाला ५ स्टार देईन , झक्कास, अप्रतिम , जबरदस्त स्टोरी, अभिनय, आणि एक वेगळा विषय .
हा सत्यघटने वर आधारित चित्रपट आहे. विकिपीडिया मधे डोकावाल तर लक्षात येईल. एक फौजी नॅशनल चॅंपियन धावपटूची ही कहाणी. चंबाळच्या खोर्‍यातून आलेल्या एका गरीब तरुणाची कथा जो उत्तर आयुष्यात शासकीय यंत्रणेला कंटाळून शेवटी डाकु बनतो. इरफान खान -अभिनय म्हणजे काय त्याचे मुर्तिमन्त उदाहरण, जबरदस्त संवाद फेक , थियेटरचा अभिनेता असल्याची पुरेपूर ग्वाही तो देतो. सहज सुंदर अभिनयाची खाण , इतर सगळे अभिनेते /अभिनेत्री पूरक पण आपल्या आपल्या जागी अफाट अभिनयाचा दाखला देतात, दिग्दर्शन, संवाद, एडिटिंग, अगदी सगळं काही बावन काशी.
माहीत नाही हा चित्रपट टॅक्स फ्री झालाय का? पण नक्कीच करावा अशी कलाकृती. ऑस्कर ला जाईल न जाईल , जिंकेल न जिंकेल पण मनाचा वेध घेणारी अफाट कलाकृती .....पान सिंग तोमर .....Salute to unsung heero's of India ...Jai Ho.......संदेश प्रताप

No comments:

Post a Comment