Friday 27 July, 2012

भरल्या डोळ्यानि मला

भरल्या डोळ्यानि मला
जेव्हा पहातेस तू,

निष्पाप काजळाला
उगाच त्रास देतेस तू................संदेश प्रताप

Thursday 26 July, 2012

थरथरलो उजेड फानसाचो

थरथरलो उजेड फानसाचो
जेवा तू किनाट काळोखात खेटलस,

सरसरलो पालो पाचोळो
तुया मातुर जुना तसाच भेटलस............संदेश प्रताप

Tuesday 24 July, 2012

दर्द हुआ तो

दर्द हुआ तो
मर्ज भी तू है

शायर मै खाक हू
मेरा "अर्ज़" भी तू है ...........संदेश प्रताप

Monday 23 July, 2012

तुझं जवळ नसणं

Friday 20 July, 2012

"बालपण"

ना माय बाप भाऊ बहीण
ना कुणी इथे रक्ताचं दिसतं

जगले उरी प्रश्नार्थक आयुष्य
न कळले कधी हे "बालपण" काय असतं? ..........संदेश प्रताप

फुलाचा जगण्याचा तग

फुलाचा जगण्याचा तग
इवल्याश्या कळ्यात,

अख्खं माझं जग
तुझ्याच दोन डोळ्यात.........संदेश प्रताप

Thursday 19 July, 2012

मी चालत राहतो न पहाता

मी चालत राहतो न पहाता
अश्रूना गुन्हा कळेपर्यंत,

तू मात्र पहात राहतेस
माझी नजर पुन्हा वळेपर्यंत.......संदेश प्रताप

Wednesday 18 July, 2012

तुझी माया तशी साधी सरळ

तुझी माया तशी साधी सरळ
थेट काळजाला  भिडते,

तू नसलीस क्षणभर तर
कळते माया का जडते .............संदेश प्रताप

म्हातारी आये .........

म्हातारी आये .........

पिकलेल्या मोतिबिन्द वात्सून
झिरापणारी दुका जेवा माका दिसली,

गोठून ठेवलेली माझी दुका
काकूळतिक येवन माका हसली......संदेश प्रताप

Monday 16 July, 2012

जणू अत्तर जसा

जणू अत्तर जसा
जिवाला लागलास तू,

न राहता कुपिबंद
तुफान वागलास तू

 मरणा सुगंधी बनून
बेभान जगलास तू..........संदेश प्रताप

Sunday 15 July, 2012

अब बस आहट है
शायद तुम्हारे आने की,
मेरे बाहों मे मुस्काराकर
यूही सिमट जाने की

बरसे पानी की बूंदे हाथों मे लिए,
तुम मेरे कानोंमे जब गुनगुनाती हो,
मेरी आँखे समा बांध देती है
दिल ही दिल मे बरस जाने की

ये बारिश भी बड़ी उलझी है
पत्थर जैसे दिल को उलझा देती है,
कभी कबार ये गुस्ताख दिल भी
हस लेता है सुनके "आहट" तुम्हारे आने की..........संदेश प्रताप

Saturday 14 July, 2012

आता गटारीची मजा रवाक नाय



तेवा वर्सातुन चारदा
कोंबडा कापायाचा,
आज्येन जीवाचा रान करून
तेन्का फाटीबुडी झापायचा

 आता आठवड्यात्सून
दोनदा बॉयलर,
तर कधी हायफाय
रेडिमेड पाय,

आता गटारीची मजा रवाक नाय

त्या निमतान सगळे
घराक परतान यायचे,
जुने दोस्त दार,भावबहिणी
गजालि व्हायचे

आता जो तो कमावनारो
भायल्या मजेक सवाकलो,
हेंचे पाय आता घरात
आवशीबापाशी वांगडा थारत नाय

आता गटारीची मजा रवाक नाय

जुन्या आगळाची सोलकढी
नि घरचो लाल भात,
चुलिवरचा मटान खाता खाता
मस्त संपण जाय रात

आता जो तो फाड फाड इंग्रजी बोलणारो
तेंचीच संस्कृती तोलनारो,
बियर नि बाटले शिवाय बिगर
जेवाण घशाखाली उतरत नाय

आता गटारी ची मजा रवाक नाय.................संदेश प्रताप

Tuesday 10 July, 2012

पुन्हा तू भेटशील तेव्हा

पुन्हा तू भेटशील तेव्हा
तू तेवढीच गोड दिसावी,

बरसणार्‍या पावसाला देखील
थांबण्याची तमा नसावी..............संदेश प्रताप

Sunday 8 July, 2012

भर पावसात वालीवर्सुन

भर पावसात वालीवर्सुन
पेंडका घेवन जाता जेवा शकला,

धाड धाड काळीज माझा
हुतत तेचि तेवा दोन भेकला.............संदेश प्रताप

Thursday 5 July, 2012

दर राती निजताना

दर राती निजताना
काळीज माझा झुझता,

दर येळेक बोलान हुनतय
पण बोलाक तुझ्याशी बुजता..........संदेश प्रताप

जरी होता तेजस्वी कर्ण सूर्यपुत्र

जरी होता तेजस्वी कर्ण सूर्यपुत्र
तरी सुतपुत्र शापित वार होता,

आयुष्याच्या शेवटी उरला तो फक्त
कुंतीचा निष्पाप "व्याभिचार" होता..............संदेश प्रताप

आज पुन्हा पाऊस

आज पुन्हा पाऊस
अर्धा भिजलेला,

तुझ्या आठवणींमधे
अर्धा रुजलेला.........संदेश प्रताप

Tuesday 3 July, 2012

सकाळी सकाळी

सकाळी सकाळी जेव्हा तू
तुळशीर पाणी घालुक येतस्,

दिवसा उजेडी तेव्हा तू
माझा काळीज चोरून नेतस...........संदेश प्रताप

Monday 2 July, 2012

आयुष्यभर उराशी बांधून जगलो

आयुष्यभर उराशी बांधून जगलो
खळगी भर पोटाची भ्रांत,

माय मायेनं देई मीठ भाकरी
जगण्याची नव्हती खंत...........संदेश प्रताप

Sunday 1 July, 2012

त्या रात्री सरले

त्या रात्री सरले
ते निष्ठुर चांदणे,

ना जमले नजरेने
तुला बांधणे...............संदेश प्रताप