Friday 29 June, 2012

"विठ्ठल विठ्ठल" नावाचा खोटा

"विठ्ठल विठ्ठल" नावाचा खोटा
चित्कार कानी आला,

निष्पाप भक्तिभावाचा
आज पुन्हा "बलात्कार झाला"...........संदेश प्रताप

निरपेक्ष भक्ति करणार्‍या विठ्ठल वेड्याना शुभेच्छा !!!

जेवा येशित पावसात अव्न्दा

जेवा येशित पावसात अव्न्दा
तेव्हा सावशीत भेटान जा,

तीनसाना किर्र काळोखात
त्याच पान्द्नित खेटान जा.......संदेश प्रताप

Thursday 28 June, 2012

जेव्हा पापण्यांचे

जेव्हा पापण्यांचे
एकमेकांवरती वार झाले,

तेव्हा बेसावध "काजळ"
हकनाक ठार झाले..........संदेश प्रताप

Wednesday 27 June, 2012

जेव्हा समजून घेणारं नातं

जेव्हा समजून घेणारं नातं
असमजूतदार होतं,

तेव्हा खूप सारं बोलून सुद्धा
बोलणं रीत राहतं ...........संदेश प्रताप

Tuesday 26 June, 2012

गुनहगार है आपके

गुनहगार है आपके दिल से
इसका हमे कोई गम नही,

कातिलाना मुस्कुराना आपका
गुनहगार आपभी कुछ कम नही............संदेश प्रताप

Sunday 24 June, 2012

बॅचलर्स......


बॅचलर्स......

गजबजलेल शहर
दमुन घरी जाण्यास व्याकूळ
रिप रिप पाऊस
भिजलेली रात्र

अस्तावस्त खोली
जाणून बुजून केलेला अंधार
एक झीरोचा बल्ब
पेटून नसल्यासारखा

चार पाच जिगरी दोस्त
भिंतीच्या आधराने टेकलेले
त्याच त्याच प्रोफेशनल लाइफला
अगदी मनापासून पकलेले

चार पाच टाइम्स ऑफ इंडियाची पाने
वेडी वाकडी पसरलेली
चिवडा, चकली, शेंगा ची पिशवी
उगाच तिच्यावर घसरलेली

पाच सहा स्ट्रॉंग बियर,चायनीस
बरोबर इकॉनॉमिकल जॉइंट उर्फ सुटटा
चढत जाणार्‍या पावसाबरोबर
फुलत होता रात्री ब्याचलर्सचा कट्टा....................संदेश प्रताप

Tuesday 19 June, 2012

झिला अवन्दाचो मिरग

झिला अवन्दाचो मिरग
बरो हा सो दिसताहा,

जा जा पेरलव
ता येवस्थित रुजाताहा..........संदेश प्रताप

Sunday 17 June, 2012

काल अचानक नजर

काल अचानक नजर
भिडवून गेलिस,

पुन्हा निष्पाप डोळ्याना
रडवुन गेलिस.............संदेश प्रताप

Saturday 16 June, 2012

द्रौपदी

मनातले श्वापद जेव्हा
वासनांध झेप घेते,

निष्पाप द्रौपदी तेव्हा
नजरेने विवस्त्र होते.............संदेश प्रताप

Friday 15 June, 2012

आपण

सावळा वर्ण
बोलके डोळे
थोडसं काजळ
हसरा चेहरा

म्हणजे "तू"

गंभीर चर्या
वेडी माया
कोड्यात हसणं
... तुझ्याशी असणं

म्हणजे "मी"

आश्वासक सहवास
विश्वासाचा प्रवास
एकमेकांचा ध्यास
सोबत असण्याचा प्रयास

म्हणजे आपण ........................संदेश प्रताप

निसटल्या क्षणांची खंत

निसटल्या क्षणांची खंत
वेड्या दिलाशी टांगली,

तुझ्या नसण्याची व्यथा
साजरी करावी लागली.............संदेश प्रताप

Monday 11 June, 2012

कोंच्या तरी लग्नाक दिसलस

कोंच्या तरी लग्नाक दिसलस
बोलाक नाय गावलो मोको,

इलस कधी गावच्या दिशेन
तर भेटल्या बिगर जाव नको...........संदेश प्रताप

Sunday 10 June, 2012

तू म्हणालीस मी हरवलेय

तू म्हणालीस मी हरवलेय
वाटत नाही तुझ्या सोबत असेन,

कधी वाट सापडेलही
पण मी तिथे नसेन...............संदेश प्रताप

झळा पावसाच्या

झळा पावसाच्या कितीश्या उराव्या, आठवणींच्या हिंदोळ्यावरी अमानुष ठराव्या.......संदेश प्रताप

पहिला पाऊस

तुझं माझं नातं पहिलं पहिलं
भर पावसात डोळ्यात भरून राहिलं,

तू म्हणालिस आज पाऊस आला
पण खटकल तुझं नसणं,
मी हसून म्हणालो मग काय झाल?
... मला भावलं तुझं असं रुसण

तशीच फोन वर तू उगाच चिडलीस
"आता किती दिवस असं जगायचं"
चिडल्यावर तू अजुन सुंदर दिसतेस्
म्हणून का चिडून वागायचं?

पावसाची झर झर तशीच चाललेली
त्याची झळ मला दूरवर काळजात लागलेली,
"पुढच्या पावसात तर आपण सोबत असू?"
"खरच रे एकमेकाच्या मिठीत भान हरवून बसू"

आपल्या नात्याचा पहिला पाऊस असाच पडला
पहिला दूराव्याने रडला, अन् मग दूराव्याशी लढला

पहिला पाऊस तुझ्या पासून दूर
खूप काही सांगून गेला,
रोम रोमात स्पर्शून
हळूवार काळजातून रांगून गेला.......................संदेश प्रताप

पाऊस

कांदाभाजी फूल प्लेट एक
सोबत कटिंग, छोटा गोल्ड फेक,

पाऊस म्हणजे तरुणाईचा भास
पुसट हिरवं रान शायद त्याचाच आभास..............संदेश प्रताप

आठवणी

पाऊस आला थिजलि वाणी
भिजली आसवं दाटल पाणी,
अर्धी कहाणी, अर्धी गाणी
उरल्या त्या फक्त सार्‍या "आठवणी"................संदेश प्रताप

तू

उगाळण्या दु:ख्खे
हजार असतील माझी,
जगण्या सुख मात्र
एकुलतं एक "तू"...................संदेश प्रताप

Saturday 2 June, 2012

Mother

She is the only girlfriend of yours who never make up for you , neither says " I Love u to you " ....But still your heart goes for her every single moment ......Mother .........Every Boys First girl ....Happy Mothers Days :)

तुझी नि माझी सपनात नजरा नजर काय झाली

तुझी नि माझी सपनात नजरा नजर काय झाली
आजूबाजूच्या दासनीन्का सर्सरावन फुला इली,

सुकलेलि व्हाळी तुडूम भरान गेली
तितक्यात आवशीचे ऐकाक इले गाळी ..............संदेश प्रताप

सरली सये पहाट

सरली सये पहाट
गंधित तुझ्या सवे,
उलगडू दिवस नव्याने
नाते असे जरी जुने...........संदेश प्रताप

केलास वार तू जेव्हा

केलास वार तू जेव्हा
नाते तोडण्याचा,

सुटला गंध सुगंध तेव्हा
जखमी मोगर्‍याचा............संदेश प्रताप

खूप दिवस झाले

खूप दिवस झाले
खास काहीच लिहिलं नाही,

"तुझ्याशिवाय" लिहीण्या सारखं
आताशा काहीच उरलं नाही......................संदेश प्रताप

झिला चार दिशेन उंडार्लस

झिला चार दिशेन उंडार्लस
तरी याक याद राख,

पेज भाकरी नि सुकाट
शेवटी गाव आपला लाख.........संदेश प्रताप

व्हय "मिरग" उतारलो

तीन सांजेची येळ
चुडतान्का धुमी घालीत
म्हातारी डोळे चोळीत
पाय पसरून विस्तारलेलि

भुकेन कोकटणारा बारक्या
...तारपासली घरदारीण
कूळक्षा करीत घोवाचो
सर्गाचि आशा करून नर्कात जावन बसलेलो

पाटल्या दाराक मांगरात
तानेलेला वासरू दाया हिसकावित
गाय हांबरत बिचारी
पेंडिक चघळत

म्हातारो फाटक्या धोतार सावरित
पड्येत उभो विनमस्क
पिंगानी फेरो धरून गुलुपाचो
बव्तेक तेकाच येडाउन दाख्यित

सगळी एकाच चिंतेत
अवन्दा तरी मिरग येळेर येव्चो
हळूच पुटपुटली म्हातारी
"बेगिना धाडलस तर तुपान वात धरीन समोर"

म्हणाची खोटी नि उंबर्‍यारचो दिवो सरभरलो
म्हातारो चमाकलो
म्हातारी सणकण उठली
रडक्या प्वार धावला
घरदारीण हसली

व्हय "मिरग" उतारलो..............................संदेश प्रताप

वेदना

वेदना आज खरी आहे, हास्य खोटे जरी आहे ......संदेश प्रताप

"प्रेम" म्हणजे

"प्रेम" म्हणजे भांगेची नशा, आणि "प्रेमभंग" म्हणजे भांग पिल्यावर होणारी दुसर्या दिवशीची दशा .......संदेश प्रताप

आज पाऊस हिरवा पुन्हा

आज पाऊस हिरवा पुन्हा
तुझा माझा अनुबंध तोच जुना,

का कश्या समजेना मना
उरती निशब्द पाऊल खुणा...............संदेश प्रताप

नसताना तू हूरहुर लावतेस

नसताना तू हूरहुर लावतेस , आठवणींच्या एकोळीत मग आपसूक मावतेस.........संदेश प्रताप