Sunday 24 June, 2012

बॅचलर्स......


बॅचलर्स......

गजबजलेल शहर
दमुन घरी जाण्यास व्याकूळ
रिप रिप पाऊस
भिजलेली रात्र

अस्तावस्त खोली
जाणून बुजून केलेला अंधार
एक झीरोचा बल्ब
पेटून नसल्यासारखा

चार पाच जिगरी दोस्त
भिंतीच्या आधराने टेकलेले
त्याच त्याच प्रोफेशनल लाइफला
अगदी मनापासून पकलेले

चार पाच टाइम्स ऑफ इंडियाची पाने
वेडी वाकडी पसरलेली
चिवडा, चकली, शेंगा ची पिशवी
उगाच तिच्यावर घसरलेली

पाच सहा स्ट्रॉंग बियर,चायनीस
बरोबर इकॉनॉमिकल जॉइंट उर्फ सुटटा
चढत जाणार्‍या पावसाबरोबर
फुलत होता रात्री ब्याचलर्सचा कट्टा....................संदेश प्रताप

No comments:

Post a Comment