Sunday 4 November, 2012

"तळीवाली बाय".

निम्हार इसवतीक
बायल बापडे ढोरापोरा
माघारी भाकरीच्या आशेन,
सरभरलेलि पाखरा घरट्याच्या दिशेन,

ओ उठतास की नाय ?
...
बायलेन हाळी दिल्यान
कडकडणार्या पानयाचे
चार तांबे आंगर उपसून तो तयार

आंगार कापडा चढवून
पोरा आंगाक खेटलेली
बाबानु जाव नको
झाला तरी आमका तुमचा खावक नको


तितक्यात बायलेन भाकरी
पुढयात आपटल्यान
“कसला नसता खूळ घेतल्यानी हा”
म्हणान रडणार या पोराक धोपटल्यान

अंधार पडा पडाक
अंदाज घेवन भायर पडलो
फाटकी पिशी पोटाशी बांधून
बिचारो घळाघळा रडलो

डोळ्यातली आसवा गिळान
चलाक लागलो जणू काय झालाच नाय,
नशीबाच्या दशावतारान बनायल्यान तेका
"तळीवाली बाय"...............संदेश प्रताप

No comments:

Post a Comment