Sunday, 23 October 2011

अवन्दाचो चावदीस



                                                     @संदेश -मिया पक्को मालवणी





Tuesday, 18 October 2011

गावची दिवाळी




गावची दिवाळी

लहानपणी दिवाळी गावीच साजरी व्हायची.

कोकणात जेवढ्या मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी साजरी केली जाते तेवढ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जात नाही. मुख्यता ह्या हंगामात भात कापणी जोरात चालू असते तसेच  गणपतीसाठी केलेल्या खर्चाचा आवाका एवढा असतो की दोन महिन्यात जोरदार दिवाळी साजरा करण्याची ऐपत नसते.

पण काही आठवणी नक्कीच छान होत्या!!! आमच्या लहानपणीच्या!!!

 किमान चार पाच दिवस अगोदर  हळू हळू लगबग चालू व्हायची. गावठी पोहे बनवण्यासाठी गिरणी गर्दीने फुलून जायच्या. आम्ही आजी नाहीतर काकी बरोबर जमेल तेवढ भाताच बारदान डोक्यावर घेऊन गिरणीवर जायचो. आणि आपला नंबर कधी येतो त्याची वाट बघत त्या बारदानवर बसून राहायचं. गिरण चालवणारा तर आम्हा पोराना कोण तरी हीरोच वाटायचा . गिरण म्हणजे आजीच्या गोष्टीतली राक्षस जणू.   अखेर नंबर यायचा , गिरणीवाला काका पहिल्या धारेचे गरमा गरम पोहे हातावर पोसभर द्यायचा . त्या पोह्यांचा स्वाद आणि सुगंध अजूनही डोक्यात भिन्तोय. कुरकुरीत पोहे खायची वेगळीच मजा असायची.

आकाश कंदील
आज सारखे रेडिमेड कंदील तेव्हा नसायचे आणि असले तरी परवडणार कोणाला?? मग सगळी पोरं कंदील करायला बसायचो. घोटिव कागद , बांबूच्या काठ्या , झीरोचा बल्ब , गावठी पीठा पासून बनवलेली चिकट साधन. अतिशय देखणा आकाश कंदील तयार व्हायचा . आणि आम्ही समाधानाने पावन व्हायचो. घरातल्या मोठ्यानी शाबासकी दिली तर मग दुधात साखरच.

दिवाळीच्या पहाटे उठण्यासाठी तर स्पर्धा लागायची. जो कोणी पहिला उठणार त्याला २ किव्वा ५ रुपये बक्षीस मिळायचे. त्या बक्षिसाची स्वप्न बघता बघता कधी डोळा लागायचा कळायचा देखील नाही. सकाळी उठून पहिल आजूबाजूला बघायचो कोण प्रतिस्पर्धी भाऊ बहीण उठलय का??? मग आंघोळीला जायच..आजी सुगंधी उटण अंगाला चोळत असे. छान सुगंध असायचा.

आंघोळ झाली की महत्वाच म्हणजे कारीट फोडणे. त्याचा थोडासा अतिशय कडवट रस तोंडाला लावायचा एक पद्धत म्हणून.
मी आजीला एकदा विचारला सुधा तर मला बोलली की आता पुढचा आठवडा भर गोडधोड खाणार ना म्हणून कडू रस प्यायचा.
एवढ सगळ आटोपल्यावर सगळे जन जमायचे पहिल्या फराळाला ....गोडे साखरेचे पोहे , भावनागरी, लाडू, शंकरपाळया बरच काहीबाही ऐपती प्रमाणे असायच. वाड्यात प्रतेकाच्या घरी फराळ पोचवला जायचा. कोणी मुंबईकर चाकरमानी उतरला असेल तर फराळात काही खास पदार्थांची रेलचेल असायची. मैसूरकाप ज्याला मालवणी गावकरी प्रेमाने शिनेला अस म्हणतो.

संध्याकाळी दिव्यांची आरास लावून प्रतेकजन आपला फाटकेपणा लपवण्याचाचा आटोकाट प्रयत्न करत असे. आम्हा पॉरांसाठी अजुन एक महत्वाचा इवेंट असायचा तो म्हणजे भाऊबीज , आई बाबांकडून ४/५ रुपये घेऊन किवा जमवलेल्या खाऊच्या पैश्यातून बहिणीला ओवाळणी घालायची. आणि मग तिच्या नकळत पुन्हा बिचारीचे पैसे उडवायचे . बहुतेक तिला सुधा माहीत असायचं जाणून बुजून माहीत नसल्याचा आव आणायची. खर्च निखळ आनंद म्हणतात तो ह्याला . आजच्या बडेजावी नात्यां पेक्षा कितीतरी निरपेक्ष, निर्वाज्य, सहज सुंदर.

अशी आमची दिवाळी अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत चालायची. आणि घरचे आकाश कंदील अगदी फीकट रंग होई पर्यंत. आतला झीरोचा बल्ब मात्र तसाच दरवर्षी वाट बघायचा नव्या सोबत्याची नव्या आकाश कंदिलाची.......

कोणीतरी घरातलं जाणतं म्हणायचं...."हय कसली इली हा दिवाळी???, पुढल्या वर्सा पोरान्का घेवन म्हमैईक जा रे भाऊ..( माझे बाबा)...आम्ही सुधा हरखुन जायचो आणि पुढच्या वर्षीच्या मुंबईच्या झगमगीत दिवाळीची वाट बघात बसायचो....पण आज काळतय तो नुसता झगमगाट च होता खरी माया गावी आजीच्या खरखरित हाताने लावलेल्या उटन्यात होती आणि गावठी कुरकुरीत फोवात होती....


.......संदेश बागवे

इंटरनेटचा खूळ

Saturday, 15 October 2011

दारू

मैत्रीचे आपूल्या सोहळे
अजूनही याद आहेत ,
रिचवलेले मद्य उंची की
भिनलेली नशा
अजूनही न सुटलेले वाद आहेत


***************************

कौन कहता है ?
शराब बरबादी का सबब है,

बरबाद दिल को सहलाने का
वोह ही तो मरहम गजब है


****************************

नक्षीदार प्याल्यानमधे
गंध तुझा खुणावतो

तिच्या केसातील मोगरा सुधा
तुझ्या पुढे मंदावतो


****************************

लोकांसाठी शायद
असेन मी तळीराम.......

पण पिणे हा फक्त बहाणा होता
दोस्ती यारीच्या रात्री जागावण्याचा

साल्यांसाठी नवा नजराणा होता


*******************************

दारूला दारू म्हणा, डोक्यात चढते आणि भणभण करते.
पण दारूला मद्य म्हणा हळूवार रंगात येऊन स्वर्गीय सुखाचा अनुभव देते


************************************************************

दारू म्हणजे फक्त
मुलांची जाहांगीरदारी
हा काळ आता जुना झाला

हाय फाय क्लब पब मधे
पोरींच्या कॉकटेल मॉकटेलचा
आता जमाना आला


**************************

आम्ही तरी काय करणार राव
साली ही दारूची मात्रा सगळी कडेच लागू पडते

सुख असो वा दुख असो
सगळे मार्ग दारूची बाटलीच काढते


****************************************

असच आपल मनातलं


मैत्रीत तुमच्या खूप हसलो
अवचित वेळी थोडासा रडलो

असच आपल मनातलं मांडत गेलो
मैत्रीची फुले सांडत गेलो

अशीच राहू दे मैत्री आपुली
रागाऊ नकात जर केली वाकुली

माणूस आपल हक्काच आहे अस आम्ही मानतो
असच आपल मनातलं वेळोवेळी सांगतो

Tuesday, 11 October 2011

हाल्ली काय झाला काय समाजना नाय

हाल्ली काय झाला काय समाजना नाय
मनाच्या कोपर्‍यात काय उमाजना नाय

लिवक गेला काय की सुचना नाय
मन मारुन लिवक रुचना नाय

हल्ली काय झाला काय समाजना नाय........

Sunday, 9 October 2011

भावपूर्ण श्रद्धांजली




चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश...जहाँ तुम चले गए...
इस दिल पे लगाके ठेस...जाने वो कौन सा देश...जहाँ तुम चले गए...

रुहानी आवाज अनंतात विलीन .....
पद्मविभूषण जगजीत सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Saturday, 1 October 2011

आपण सगळेच अर्धवट गांधीच



आज आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजीची जयंती. गांधीजी म्हणजे डोळ्यासमोर येतो तो गांधीवाद, अहिंसा, गांधीगिरी.
गांधी विचारसरणीवर अनेक दुमते आहेत. एक वर्ग असाही आहे जो गांधी ह्या व्यक्तीचा विरोध करणारा आहे. पण मला त्या वरती काही लिहायच नाही आहे. कारण तेवढी माझी कुवत नाही

मी एक सामान्य माणूस म्हणून विचार करतोय की मी एखाद्या विचाराचे समर्थन करतोय म्हणजे नक्की काय??? मी नुसता तोंडाने बोलतोय, की आचरण करतोय??? "आय हेट गांधी" म्हणणं खूप्प सोप्प आहे , पण गांधी म्हणजे काय रसायन होतं हे किती लोकानि वाचलय?? किव्वा सावरकर जहालमतवादी होते, पण त्याना जी क्रांती अभिप्रेत होती त्याबद्दल किती जनाना माहीत आहे???

दोन्ही विचार खरं सांगायाच तर आउट डेटेड झालेत. एक साध उदाहरण , तुम्ही संध्याकाळच्या वेळी रस्त्यातून जात आहात, आणि तुम्ही पहिलात की ४/५ तगडे गुंड एका मुलीची भर रस्त्यात छेड काढतायात तर तुम्ही नेमका कोणता विचार त्या परिस्थितीत वापराल?? गांधीगिरी??? हात जोडुन त्या गुंडाणा   सांगाल , मित्रानो तुम्ही जे करताय ते चुकीच आहे, पाप आहे, तुम्हाला नरकाच्या दिशेने नेणारं आहे. आणि ते गुंड तुमच म्हणणं शांत पणे ऐकून घेतील???? की मूवी मधल्या हीरो सारखं त्याना मार द्यायला हात सरसवाल????म्हणजे आपली असली नसलेली हाडे एक होतील.  थोडक्यात काय दोन्ही विचार प्रॅक्टिकली फेलच.

सारासार विचार हा असेल की जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देणे किव्वा जवळच्या वस्तीतील लोकांची मदत घेणें. पण आपण किमान हे तरी करू का??? नाही आपल्याला तेवढा वेळ आहे कुठे??? आणि पोलिसांच्या लफड्यात कोण पडेल??? रात्री पार्टीला जायचय, फुकटाचा टाइम वेस्ट!!!

म्हणून मी म्हणालो, आपण सगळे अर्धवट गांधी,

अर्धवट गांधी का?? तर पूर्ण सावरकर कधीच होऊ शकणार नाही पण मवाळ विचारांचे , स्वार्थी , तोंडाने वायफळ क्रांतीच्या , अन्यायाच्या भाषा करणारे अर्धवट गांधी होऊ शकतो.

पूर्ण गांधी व्हायची आपली लायकी नाही आणि कुवत सुधा........