Sunday 28 August, 2011

गणपतीत जावचा तर फक्त नि फक्त आमच्या कोकणात

फटाक्यांच्या धुरान लागलेली ढास
नि सुगंधी अगरबत्ती चो वास
आपल्या भाषेत साजयलेली आरास
पोराटोरानी जागराना करून घेतलेलो तरास

लखलखती चाइनीस तोरणा ,
पिवळी जर्द हरणा
घरा समोरची रांगोळी
फेडता डोळ्यांचा पारणा

घर शेवाळी सारवून तयार
घरातली दमलेलि म्हातारी सुदिक
चुलीवर उभी रवता फुकणी घेवण
एका पायार

कोणाच्या घरची पुनेला
गाजवक लागतत डबलबारीची भजना
पोरं मातुर करीत आसतत
तवशी चोरूची योजना

चाकरमान्यांची फॅकांडा
खिरीच्या गोड गोड वासासकटची
चुलीची धूरकांडा

धुपाचि पुडी , दुर्वांची जुडी
समई तला त्याल, पारड्यातली वाल
दासनिची फुला, सांचेची बेला

सगळा उरात दाटान रवता
आठवणिनी मगे डोळ्यात्सून उरलेलो शरावण व्हावता.


आवशीच्यान गणपतीत जावचा तर फक्त नि फक्त आमच्या कोकणात

No comments:

Post a Comment