Mazya Kavita (मी माझ्या कवितेतून)
घरापासून दूर राहून येणार्या आठवणिना समर्पित
Monday, 13 August 2012
वोह तो आँखे थी
वोह तो आँखे थी
बयाँ कर गयी सूब कुछ,
लब्ज होते तो शायद
मुकर गये होते अब तक..........
तुझ्या घरापर्यंत पोचलेलं
तुझ्या घरापर्यंत पोचलेलं
आभाळ माझंच आहे ,
माझा निरोप घेऊन पावसाला
तुझ्याजवळ पाठवायचं आजच आहे ..........संदेश प्रताप
जिंकली मी राखून
जिंकली मी राखून
प्रेमात सबुरी,
तरी मी उरली
राधा अधुरी............संदेश प्रताप
कळलेच नाही जगताना
कळलेच नाही जगताना
काय गेले काय राहीले बाकी,
आठवणींच्या भर गर्दीत
मी पुन्हा एकाकी ......संदेश प्रताप
कधीतरी माझ्यासाठी
कधीतरी माझ्यासाठी
जगून बघ ,
नाहीच जमलं तर
माझ्याकडे बघून जग .......संदेश प्रताप
आठवणींचा मागोवा
आठवणींचा मागोवा
नेहमी मीच का घ्यावा ,
कधीतरी तू सुद्धा
तुझ्या मनाचा पुरावा द्यावा ..........संदेश प्रताप
Tuesday, 7 August 2012
फुटकी कौला
फुटकी कौला
फाटकी भिंत
पावसाक हतबल
मीणमीणती
म्हातारी एकटी
कमरेत्सुन मोडलेली
हाडून अंगात उसना बळ
नागपचम गेली
पाट देवन इली
आता वाट बघित
फकस्त गणपतीची (?)
व्हय झीलाची
मनीऑर्डर येतलि
येवस्थित भागवलय
तर दिवाळी जातली
पोस्टमन इलो
म्हातारीची लगबग
अगे आवशी
झील येताहा
म्हातारी तरपाटली
मनातल्या मनात करपाटली
आता सगळे येतले
दानभर खातले
म्हातारी बसली
इचार करीत
कोन कोन म्हातारे हत
जावचे वर अवन्दाच्या वारीत
कोण गचाकला
तर कितक्या बरा
दीड दिवसाचो गणपती
पैको वाचात जरा .................संदेश प्रताप
Monday, 6 August 2012
मन मोकळं होतं
मन मोकळं होतं
तुझ्याशी बोलताना,
आपसूक उसवत जातं
वेड्या गाठी खोलताना..........संदेश प्रताप
दुरावले काही क्षण
दुरावले काही क्षण
तुझ्या माझ्या भेटीचे,
सरविले तेही रण
विझविले दिवे वेड्या रातीचे..........संदेश प्रताप
एक ही दुआ है रबसे
एक ही दुआ है रबसे
इतनी ताक़त मिले मुझे
के हज़ार खुशिया आपके
दामन मे डाल दू
और इतनी ताक़त भी ना मिले मुझे
की कभी ग़लती से भी आपको
दर्द देके बेहाल कर दू..............संदेश प्रताप
जखडलेली जुनी प्रथा
परिस्थितीमुळे ज्या बहिणी खंबीरपणे आपल्या भावंडाना पोसतात त्याना सलाम!!!
जखडलेली जुनी प्रथा
उमटुनी जाते मनी व्यथा,
संरक्षणीले मी त्याला
...
बनली मी जणू कुमारी माता ,
चार धागे बांधुनी पोकळ मनगटावरी
नावाचा भाऊ स्वार्थीपणे मिरवी उसनी गाथा............संदेश प्रताप
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)